श्रीनगर ः पोलिसांच्या बसवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात ‘अॅक्शन मोड’वर आलेल्या भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी गेल्या अनेक वर्षांपासून ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेला दहशतवादी अबू झरारचा अखेर खात्मा करण्यात यश मिळविले.
काश्मीरमधील पूँछ आणि राजौरी येथील भागांत त्याच्या अतिरेकी हालचालींबाबत भारतीय सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्यानुसार भारतीय लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली होती. मंगळवारी त्याचा ठावठिकाणा सापडताच भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करच अबू झरारला कंठस्नान घातले.