या बद्दल माहिती देताना पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर. मोहोळ म्हणाले कि,'' पुणे शहरातील रुग्णालयात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यातील प्रसिद्ध 'जनकल्याण रक्तपेढी' आणि इतर रक्तपेढी यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते , तर त्यांना साथ म्हणून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे दिवस भर रक्तदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे''.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कुठेलीही भपकेबाजी न करता रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान हे लक्ष समोर ठेवून, समाजाप्रती भान ठेवून आणि सामाजिक कर्तव्यातून रक्तदान करण्याच आवाहनही त्यांनी या वेळेज केले. तसेच ते स्वतः रक्तदान करणार असून, कोविड लस घेतल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीनंतर कोणीही रक्तदान करू शकत अशी माहिती त्यांनी या वेळेज दिली. रक्तदानाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे.