अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्यावर भारतीयांचे लक्ष ; मिम्सचा पाऊस

सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

    06-Nov-2021
Total Views | 131

Cricket_1  H x
मुंबई : भारतीय संघाने स्कॉटलंडविरुद्धचा सामना जिंकला आणि स्पर्धेतील आपले आव्हान जागे ठेवले आहे. तरीही सर्व भारतीयांची नजर ही अफगानिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यावर असणार आहे. कारण, जर अफगानिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तरच भारतीय संघ हा उप्न्त्या फेरी गाठू शकतो. नाहीतर संघाला दुबईमधून रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागणार आहे. एकीकडे हा सर्व जर-तरचा खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र सोशल मिडियावर मिम्सचा पाउस पडताना दिसत आहे.
 
 
 
 
 
भारताने स्कॉटलंडवर ८ विकेट्स आणि ८१ चेंडू राखून धमाकेदार विजय मिळवत रनरेटदेखील उत्तम केला आहे. सध्या भारताच्या खात्यात ४ गुण जमा असून तिसऱ्या स्थानावर आहे. तर १.६१९ रनरेट मिळवून उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पाकिस्तानचा संघाने चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे.
 
 
 
 
 
तर, उर्वरित एका जागेसाठी तीन संघ दावेदार आहेत. नामिबिया आणि स्कॉटलंड संघ आधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत. न्यूझीलंडचा शेवटचा सामना आता अफगाणिस्तान संघाबरोबर आहे. तर, त्यानंतर लगेच भारताचा शेवटचा सामना हा नामिबियासोबत असणार आहे.
 
 
 
 
न्यूझीलंड संघाच्या नावावर १.२७७ इतका रनरेट आहे. त्यामुळे जर भारताला उपांत्य फेरीत धडक मारायची असेल तर अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडचा पराभव गरजेचे आहे. क्रिकेट हा अनिश्चितता आणि चमत्काराचा खेळ आहे.
 
 
 
 
 
अशा परिस्थितीमध्ये नेदरलँडने दोन वेळा, तर बांगलादेश आणि अफगणिस्तानने प्रत्येकी एक-एक वेळा समीकरणे बदलेली आहेत. आता पुन्हा एकदा अफगानिस्तान संघ हा पराक्रम करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एवढेच नव्हे तर, सर्व भारतीय क्रिकेट प्रेमी हे अफगानिस्तानचा विजय व्हावा, अशीच इच्छा बाळगून आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121