निद्रा - भाग : ६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

sleep_1  H x W:
शरीराचे स्वतःचे एक ‘जैविक घड्याळ’ असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये सापेक्षाने थोडाफार बदल असतो. पण, रात्री झोपणे व दिवसा जागणे यापद्धतीने हे नियमित प्रत्येक व्यक्तीमध्ये केलेले असते. झोपण्यावर, उठण्यावर व इतर अन्य दिनचर्या अवलंबून असते. शरीराच्या या स्वाभाविक लयीलाच ‘रिदम’ म्हणतात. या लयीप्रमाणे शरीराची यंत्रणा सुरू असल्यास आरोग्यप्राप्ती व या लयीत बिघाड म्हणजे शारीरिक-मानसिक-भावनिक अनारोग्य होय. अनियमित निद्रेमुळे शरीराची प्राकृतिक लयबद्धता बिघडते. काही वेळेस चुकीच्या सवयींमुळे, तर काही वेळेस व्यवसायामुळे सतत झोपेचे तास व वेळा बदलतात.
गाढ झोप लागणे स्वास्थ्यासाठी व आरोग्यासाठी गरजेचे आहे. रात्रीची सहा ते आठ तास शांत, गाढ झोप घेणेही आवश्यक आहे. (तारुण्यावस्थेत व प्रौढावस्थेत) लहानपणी यापेक्षा जास्त व म्हातारपणी सहा तासांपेक्षा कमी झोप चालते. पण, शरीराच्या संपूर्ण विश्रांतीसाठीही झोप सलग असणे गरजेचे आहे. तुटक झोप, अधिक स्वप्न पडत लागलेली झोप, उशिरा लागणारी झोप, एकदा जाग आली की, पुन्हा उशिराने लागणारी झोप इ. सगळे प्रकार प्राकृतिक नाहीत.
आधीच्या लेखांमधून निद्रानाशाबद्दल विस्तृत माहिती आपण बघितली. आजच्या लेखातून ‘अनियमित निद्रा’ या प्रकाराबद्दल. सविस्तर जाणून घेऊया - ‘अनियमित निद्रा’ पद्धतीबद्दल (इनरेग्युलर स्लीप पॅटर्न).
या प्रकारच्या झोपेच्या विकृतीमध्ये मनुष्याला सलग झोप लागत नाही. सलग झोप चार तासांपेक्षा कमी लागते व याप्रकारचे छोटे-छोटे झोपेेचे ‘पॅटर्न’ दिवसभराच्या २४ तासांमध्ये कितीही वेळा होऊ शकतात. याप्रकारच्या झोपेमुळे २४ तासांचे जर गणित केले, तर झोप पूर्ण व बहुतांशी वेळेस आठ तासांपेक्षा अधिक झालेलीच असते. पण, यामुळे बरेचदा रात्री लवकर झोप लागत नाही, उशिराने लागते किंवा रात्रभर झोप लागत नाही वा पहाटे लागते. तसेच, सलग झोप न झाल्याने दिवसभर मरगळ राहते, मलूलता जाणवते. सकाळी उठल्यानंतरही ताजेतवानेे वाटत नाही. अनियमित निद्रेच्या विकृतीमध्ये झोपही तुटकच असते व त्याला विशिष्ट काळ व कालावधी असा कायमस्वरुपी नसतो.
हल्ली शाळकरी मुलांपासून ते सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तींमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक गॅझेट’चे ‘अ‍ॅडिक्शन’ दिसू लागले आहे. शाळा, क्लास, महाविद्यालय असे विविध छंद वर्ग झाले आहेत. तसेच ‘सिनिअर सिटीझन्स’चेविविध ग्रुप व ‘अ‍ॅक्टिव्हिटीज्’ यादेखील ‘ऑनलाईन’ झाल्या आहेत. कोरोना काळात घेण्याची दक्षता,आसपासचे भीतीचे व साशंकतेचे वातावरण, एकटेपणा आणि घरातील कर्त्या मंडळींच्या आज्ञेचे पालन अशा अनेक विविध कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकदेखील घराबाहेर पडण्यास घाबरतात. मग, घरबसल्या मनोरंजनाच्या विविध यंत्रांच्या सवयी व त्या सवयींचे हळूहळू व्यसनाधीनतेमध्ये रूपांतर होताना दिसू लागले आहे. या सगळ्या ‘इलेक्ट्रॉनिक गॅझेट’मधून निळ्या प्रकाशाच्या लहरी उत्सर्जित होत असतात. या निळ्या प्रकाशलहरींमुळे बुद्धीला दिवस असल्याचा संभ्रम होतो. मेंदूला रात्र झाली, हे कळत नाही, अवगत होत नाही. त्यामुळे रात्री झोपताना ‘मोबाईल’, ‘टॅब’, ‘लॅपटॉप’ बघत काम करणे टाळावे.
शरीराचे स्वतःचे एक ‘जैविक घड्याळ’ असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये सापेक्षाने थोडाफार बदल असतो. पण, रात्री झोपणे व दिवसा जागणे यापद्धतीने हे नियमित प्रत्येक व्यक्तीमध्ये केलेले असते. झोपण्यावर, उठण्यावर व इतर अन्य दिनचर्या अवलंबून असते. शरीराच्या या स्वाभाविक लयीलाच ‘रिदम’ म्हणतात. या लयीप्रमाणे शरीराची यंत्रणा सुरू असल्यास आरोग्यप्राप्ती व या लयीत बिघाड म्हणजे शारीरिक-मानसिक-भावनिक अनारोग्य होय. अनियमित निद्रेमुळे शरीराची प्राकृतिक लयबद्धता बिघडते. काही वेळेस चुकीच्या सवयींमुळे, तर काही वेळेस व्यवसायामुळे सतत झोपेचे तास व वेळा बदलतात. उदा. पायलट, एअर होस्टेस इ. जे वेगवेगळ्या ‘टाईम झोन’मध्ये काम करतात. यांचे ‘टाईम झोन’ सतत बदलतही असतात. ‘आयटी’ क्षेत्रातील व्यावसायिकांनाही अमेरिकेच्या किंवा युरोपच्या वेळेप्रमाणे कामाचे तास असल्यास ‘सरकॅडियन’ लय बिघडू शकते. ‘शिफ्ट ड्युटी’ने काम करणार्‍यांमध्ये ‘नाईट वॉचमन’, रुग्णालयामध्ये रात्रपाळी करणारे इ. ज्यांच्या ‘शिफ्ट’ दर आठवड्याने-पंधरवड्याने बदलतात, त्या सर्व क्षेत्रांतील व्यावसायिकांमध्ये झोपेची अनियमितता जाणवू शकते, उद्भवू शकते. काही वेळेस परीक्षार्थी, ‘प्रोजेक्ट सबमिशन’ इ. साठी तात्पुरते रात्री जागरण करून अभ्यास केला जातो व झोप येऊ नये म्हणून रात्री चहा-कॉफीचा मारा होतो. अतिप्रमाणात कॉफी किंवा मद्यपान केल्यानेही अनियमित झोप, उशिरा झोप लागणे इ. होऊ शकते.
ज्यांची खूप सावध झोप असते, अशांच्या जवळ खूप आवाज किंवा उजेड असल्यास त्यांना झोप शांत व गाढ झोप लागत नाही. रेल्वे, हायवे, विमानतळ, हॉस्पिटल इ. जवळ राहणार्‍या व्यक्तींना हा अनुभव नक्की येतो. काहींमध्ये या आवाजाची, प्रकाशाची सवय होऊन जाते व वेळेत झोप लागते. ‘सरकॅडियन’ लय अबाधित कार्यरत राहते. पण काहींमध्ये झोपेचे तंत्र कायमस्वरुपी बिघडते. हा झोपेच्या ‘पॅर्टन’मधील बदल केवळ कालावधीचाच नसतो, पण झोपेच्या गुणवत्तेत-दर्जातही फरक दिसून येतो.
तात्पुरते, थोड्या कालावधीसाठी जर अनियमित निद्रा (इनरेग्युलर स्लीप पॅटर्न) असली, तर शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर तक्रारी फारशा आढळून येत नाहीत. पण, निद्रेची अनियमिता ही बरेच महिने जर सुरू राहिली, तर त्याचा परिणाम स्वास्थ्यावर होतो. स्थौल्य, रक्तदाब वाढणे, मधुमेह होणे, नैराश्य, हृदयविकार, ‘कोलेस्टेरॉल’ वाढणे, शरीराचीप्रतिकारशक्ती कमी होणे, मैथुनसामर्थ्य कमी होणे इ. अशा अनेक तक्रारी सुरू होतात. वेळेत त्या आजाराचे कारण शोधून ते बंद (हेतु परिवर्तन) न केल्यास, खूप लहान वयातच वरील आजार जडतात. हल्ली असे रुग्णालयात बघायला मिळते की, पूर्वी जे निवृत्ती काळात आजार होत, त्यांची वयोमर्यादा आता 35-40 वयोगटात झालेलीदिसते. चाळीशीआधीच रक्तदाबाच्या गोळ्या, मधुमेहासाठीची औषधे इ. घेणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते.
या आजारांचे जर मूळ कारण अनियमित निद्रा प्रकार असेल, तर त्याला केवळ लाक्षणिक (Symptomatic) औषधोपचार केल्याने भागत नाही. त्यासाठी रात्री शयनकक्षाजवळ आवाज व प्रकाश नसावा, शयनकक्ष आरामदायक व सुखदायक असावा. झोपण्यापूर्वी किमान एक तास तरी ‘मोबाईल’, ‘लॅपटॉप’, टीव्ही व इतर ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तूंपासून लांब राहावे. शरीर व मन दिवसभर काम करून थकले, तर रात्रीची झोप शांत व गाढ लागते. यासाठी, दिवसा थोडा शारीरिक व्यायाम, हालचाल असावी. सामाजिक सुसंवाद (सोशल इंटररॅक्शन) व दिनचर्येचे नियमित वेळापत्रक असावे. यामुळे ‘सरकॅडियन’ लय अबाधित राहते व झोपेचे नियमन उत्तम होते. निद्रानाशासाठी सांगितलेले उपाय, जसे अभ्यंगस्नान, रात्री दूध व तूप पिणे, पादाभ्यंग, शांत लयीतील नामस्मरण/संगीत इ. केल्यास अनियमित निद्रा प्रकारांमध्ये फायदा होतो. (क्रमशः)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@