प्रीती सातम यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५२ च्या नगरसेविका प्रिती सातम यांच्या हस्ते प्रभागात विविध विकासकामांचे गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. "महिला सुरक्षेचे ठेऊन भान, स्वच्छ आरे अभियान" या शीर्षकाखाली स्वच्छता विषयक पूर्ण झालेल्या विविध कामांचा लोकार्पण कार्यक्रम गुरुवारी पार पडला.

    25-Nov-2021   
Total Views | 115
 
priti satam_1  
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५२ च्या नगरसेविका प्रिती सातम यांच्या हस्ते प्रभागात विविध विकासकामांचे गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. "महिला सुरक्षेचे ठेऊन भान, स्वच्छ आरे अभियान" या शीर्षकाखाली स्वच्छता विषयक पूर्ण झालेल्या विविध कामांचा लोकार्पण कार्यक्रम गुरुवारी पार पडला.
 
 
यावेळी बोलताना स्थानिक नगरसेविका प्रिती सातम म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान तसेच आरे कॉलनीतील यूनिट क्रमांक ३१ मधील आराधना वेल्फेअर सोसायटी मधील माझ्या भगिनी व माता यांची स्वच्छता गृहाविना मागील अनेक दिवसांपासून कुचंबणा होत होती. तेव्हा तातडीने मी त्या ठिकाणी भेट दिली आणि महापालिकेच्या माध्यमातून जलदगतीने पोर्टेबल स्वच्छता गृहाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणुन अशी काही कामे एक वेगळ मानसिक समाधान देऊन जातात. माझ्या महिला भगिनी व मातांसाठी अशा प्रकारची गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत," असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या पोर्टेबल स्वच्छता गृहांचे लोकार्पण स्थानिक भागातील आबालवृद्धांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121