महामंडळ अध्यक्ष देणार संमेलनाध्यक्षांना सूत्रे?

    16-Nov-2021
Total Views | 66

abmss.jpg_1  H


नाशिक : दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.प्रकृतीच्या कारणास्तव संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.




नियोजित अध्यक्षांकडे गेल्या संमेलनाच्या अध्यक्षांनी सूत्रे प्रदान करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन उद्घाटन सत्रात केले जात असते. ९३ वे साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे गेल्यावर्षी झाले होते. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते. प्रकृतीच्या कारणामुळे दिब्रिटोे त्या संमेलनालाही पूर्ण काळ उपस्थित राहू शकले नव्हते. आता नाशिकमध्ये होणार्‍या संमेलनालाही त्यांना रितसर निमंत्रण पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव दिब्रिटो साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नियोजित संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांना यंदाच्या वर्षाची सूत्रे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते देण्यात येण्याची शक्यता आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121