पवई सायकल ट्रॅक विरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे

प्रकल्प रद्द करण्यासाठी 600 पेक्षा अधिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    16-Nov-2021   
Total Views |
 
powai lake_1  H
 
 
 
मुंबई मुंबई सुप्रसिद्ध पवई तलावावर बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिका प्रशासनार्फे बांधण्यात येत असलेल्या या ट्रॅक प्रकल्पाचे काम दि. १८ नोव्हेंबरपर्यंत थांबविण्यात येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शहरातील पवई तलावात सायकल ट्रॅकच्या बांधकामाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवार, दि. १ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
 
 
 
सायकल ट्रॅकच्या विरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी अशा प्रकारचे कुठलेही बांधकाम पाणथळ जागा (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता नव्याने काही सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण वाद्यांनी हा ट्रॅक रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
 
 
 
हरित चळवळीतील कार्यकर्त्यांसह काही पर्यावरणवाद्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सदरील सायकल ट्रॅकचा प्रकल्प रद्द करण्यासाठी पत्र लिहून विनंती केली आहे. मात्र, पत्राद्वारे करण्यात आलेली ही विनंती मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यावरण मंत्र्यांत्री कार्यालयाने स्वीकारले नसल्याचा आरोप संबंधित पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तसेच या आधी महापालिका प्रशासनाला पाठविण्यात आलेल्या पत्रांनाही पालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
 
 
 
“संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पवई तलाव आणि विहार तलावाच्या आसपास बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या सहाशे सत्तर मुंबईकरांना मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आणि प्रधान सचिव कार्यालयातर्फे कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. युवा कार्यकर्त्यांनी ऑक्टोबर महिन्यात स्वाक्षरी मोहीम राबवली आणि 670 हून अधिक नागरिकांचा पाठिंबा मिळवला, अशी प्रतिक्रिया संबंधित पर्यावरण प्रेमींच्या वतीने देण्यात आली आहे.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121