मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक २०२१च्या अपयशानंतर भारतीय संघ पुढच्या भविष्यासाठी कसून तयारीला लागला आहे. १७ नोव्हेंबरपासून भारतीय संघ हा न्यूझीलंडच्या संघाशी भिडणार आहे. टी २० विश्वचषकात भारतीय संघाला सुपर १२मध्ये तर न्यूझीलंडचा संघ हा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरल्यामुळे दोघांसाठी १७ तारखेपासून सुरु होणारी ३ टी २० सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतात परतल्यानंतर भारतीय संघाने आगामी मालिकांसाठी तयारी सुरु केली आहे.
रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची २ वर्षे भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. तर, विराट कोहलीने टी २०च्या कर्णधार पदाचा त्याग केल्यानंतर रोहित शर्मा हा सध्या ३ सामन्यांसाठी कर्णधाराची भूमिका बजावणार आहे.
तसेच, भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफदेखील हा संपूर्णपणे नवा सनर आहे. भारतीयांच्या आवडता राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली रोहित शर्माचा भारतीय संघ कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचे लक्ष आता लागले आहे.
कसा असेल न्यूझीलंडचा भारत दौरा?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी २० मालिकेचा पहिला सामना १७ नोव्हेंबरला जयपूर, १९ नोव्हेंबरला दुसरा सामना हा रांची आणि अखेरचा सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. कसोटी मालिकेची सुरुवात २५ नोव्हेंबर रोजी कानपूर येथ सुरू होणार आहे. दूसरा कसोटी सामना ३ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत मुंबईत होणार आहे. पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे हा कसोटी कर्णधारपद सांभाळेल. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली हा पुन्हा संघाशी जोडला जाईल.