कवर्धामध्ये पुन्हा फडकला भगवा

कलम १४४ लागू : विहींपच्या कार्यकर्त्यांची तणावपूर्ण वातावरणात निघाली रॅली

    06-Oct-2021
Total Views | 331
Flag _1  H x W:





कवर्धा
: छत्तीसगडच्या कवर्धा भागात कट्टरतावाद्यांच्या जमावाने भगवा ध्वज उतरवल्यानंतर रविवारपासून सुरू असलेल्या तणाव निवळेनासा झाला आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी जिथून भगवा उतरवला, त्या ठिकाणी पुन्हा भगवान हनुमानाची प्रतिमा असलेला महाविरी ध्वज फडकविण्यात आला होता.



हिंदूत्ववादी कार्यकत्यांनी शांतीपूर्ण वातावरणात हे काम करत असताना काही कट्टरतावाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या प्रकारामुळे वातावरणात तणाव आहे. पोलीसांनी कलम १४४ लागू केले आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनांवर कारवाई केल्याचा आरोप आहे. पोलीस हे गुन्हेगारांना सोडून निरपराध्यांवर दंडुकेशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ताज्या आकडेवारीनुसार, एकूण ५८ हिंदू संघटनांच्या कार्यकत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.


कबीरधामच्या कवर्धा येथे झालेल्या हिंसाचार प्रश्नी हिंदू संघटनांनी बघ्याची भूमिका घेणाऱ्या भूपेश बघेल यांच्या सरकारचा निषेधही केला.यावेळी हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकत्यांनी जय श्री राम म्हणत भारत माता की जयचा नारा दिला. वंदे मातरम म्हणत राष्ट्रभक्तीच्या घोषणा दिल्या. विंध्यवासिनी देवी मातेच्या मंदिरात जाऊन पूजा करत स्थानिकांनी या परिसरात आपला निषेध नोंदविला.


मंगळवारी कलम १४४ लागू झाल्यानंतरही स्थानिक हिंदू संघटनांनी हिंसाचाराचा निषेध म्हणून रॅली काढली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल लखनऊ विमानतळावर प्रियांका गांधींसाठी धरणे आंदोलन करत होते. दुसरीकडे स्थानिक हिंदूत्ववादी संघटनांनी भगवा ध्वज उतरवताना पोलीसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चानेही या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करत बेमेतरा येथे बस स्थानकावर विरोध प्रदर्शन केले.


कट्टरतावाद्यांना आणि उपद्रविंना वाचविण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा वापर होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी लावला आहे. भाजप महामंत्री विकासधर दीवान यांनी कायदा सुव्यवस्था ही आरोपींसोबत आहे का, असा प्रश्नही विचारला आहे. तणावानंतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. भाजप नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी या घटनेचा विरोध करत काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री भूपेश बघेल साहेब कवर्धामध्ये भगवा हटविण्याचा जो प्रकार घडला तो अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. कुठल्या एका पक्षावर धर्माच्या आधारावर अन्याय होता कामा नये, दोषींवर कारवाई व्हावी.



प्रकरण काय?


कवर्धा येथे वॉर्ड क्रमांक २७ येथील चौकात सुरुवातीला कट्टरतावाद्यांनी भगवा ध्वज उतरवल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी भगवा ध्वज फडकविण्यात आला. याचा वचपा म्हणून कट्टरतावाद्यांनी ध्वज फडकविणाऱ्यांवर हल्ला बोल केला. दडगफेकही झाली. पोलीसांच्या डोळ्यादेखत युवकाला मारहाण होत होती. यात एकूण आठ जण जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121