तैपेई : सोमवार दिनांक ४ ऑक्टोम्बर २०२१ रोजी चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रात आपले ५२ युद्ध विमाने घुसविले,त्यातील ३६ हि युद्ध विमाने तर १२ हुन अधिक बॉम्बर विमाने होती.मागील एका वर्षात ७७२ हुन अधिक विमाने चीनने तैवानच्या हवाई हद्दीतून नेली आहेत. त्यामुळे तैवानमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चीनच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या तैवान बेटाला चीन वेगळे राष्ट्र मानत नाही,परंतु तैवानने स्वतःला आधीच स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे तैवान आणि चीन मध्ये नेहमीच युद्धग्रस्थ वातावरण राहिले आहे. मागील काही दशकात चिनविरोधात अनेक पाश्चिमात्य देश उभे राहिले आहते आणि त्यांनी तैवानला स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून मान्यता देताना आपण पाहत आहोत.यात भारताने तैवानशी केले 'सेमीकंडक्टर चिप' चा करार चीनच्या जिव्हारी लागला आहे.
त्यामुळे तैवानला आपल्या शस्त्रशक्तींचा धाक दाखवण्यासाठी चीनने अशी कारवाई केली आहे,असा अंदाज वर्तविला जात आहे. तैवानच्या विदेशी मंत्र्यांनी तैवान आता युद्धासाठी सज्ज होत आहे असे जाहीर केले आहे, तसेच त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अनेक देशांना आपल्या मदतीसाठी पुकारले आहे.तैवानहे कदाचित नवीन शीतयुद्धाचे बर्लिन असू शकते असा अंदाज तज्ज्ञांमार्फत वारंवार मांडला गेला आहे.