धन्वंतरी ‘अप्पा’

माणसं - धन्वंतरी ‘अप्पा’

    28-Oct-2021   
Total Views | 141

Vidyadhar Rahate_1 &
 
 
‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ या समर्थ रामदासांच्या बोधवचनाचा प्रत्यय पदोपदी जाणवून देणारे ठाण्यातील विद्याधर केशव रहाटे उर्फ मालिशवाले ‘अप्पा’ यांच्याविषयी...
 
 
 
आपल्या मातोश्रींकडून पिढीजात आलेल्या कलेद्वारे रुग्णांना हमखास बरे करणारे अप्पा रहाटे यांचे नुकतेच देहावसान झाले. गरीब, श्रीमंत, जातपात असा कोणताही भेदभाव न करता तब्बल ३० वर्षे त्यांनी हा रुग्णसेवेचा वसा अविरतपणे जपला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, सावर्डे हे अप्पांचे मूळ गाव. अप्पांचा जन्म १९५४ साली मुंबईतील लालबागसारख्या मराठमोळ्या श्रमिक वस्तीत झाला. आपल्या अंगभूत कलाकौशल्याद्वारे लहानमोठे व्यवसाय केल्यानंतर अप्पांनी काही काळ ‘बेस्ट’मध्ये नंतर ‘एअर इंडिया’मध्येही नोकरी केली. त्यावेळीही नोकरीनंतरचा आपला वेळ अप्पांनी रुग्णसेवेसाठी समर्पित केला. त्यांचा मालिशद्वारे रुग्णांना स्वस्थ करण्याचा सायंकाळचा रतीब असाच अखंड सुरूच होता. २०१० साली ‘एअर इंडिया’मधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर दिवसभर करायचे तरी काय, असा प्रश्न अप्पांना पडला. मग काय अप्पांनी आपल्या आईकडून लाभलेला अमूल्य वारसा पुढे दोन सत्रांत म्हणजेच सकाळी व सायंकाळच्या वेळेत चालवण्याचा निर्णय घेतला. अप्पांच्या आई लक्ष्मीबाई या पूर्वी अडल्या-नडलेल्यांची मालीश करून त्यांचे आजार बरे करायच्या. ही कला त्यांच्या आईलाही तशी वारसा हक्कानेच लाभली होती. अप्पांच्या आईंची आई आणि अप्पांचे आजोबा विठु रहाटे (भगत) हे त्यावेळी बलुतेदारी पद्धतीत विनामूल्य मालीशसाठी प्रसिद्ध होते. अप्पांच्या आईला रुग्णांचे निकटवर्तीय खास घरी नेऊन उपचार करवून घ्यायचे. अप्पांचे वडील केशव रहाटे यांचाही या उपचार पद्धतीत हातखंडा. वयोपरत्वे आई थकल्याने तिने ही जबाबदारी अप्पांवर सोपवून जगाचा निरोप घेतला अन् अप्पांनीही आपल्या मातोश्रींचा विश्वास सार्थ ठरवत, तेही इहलोकीच्या प्रवासाला एकटेच निघाले.
 
 
 
अनेक वर्षे मुंबईत या घरगुती मसाज चिकित्सेद्वारे रुग्णांना बरे केल्यानंतर अप्पांनी १९९३ रोजी ठाणे गाठले. वर्तकनगरातील शिवाईनगर येथील छोट्याशा घरातच अप्पांनी रुग्णसेवेचे बस्तान मांडले. तिळाच्या तेलाने हलके मालीश करून उपयोगात आणली जाणारी ही एक अनोखी उपचार प्रक्रिया आहे. दोन ते चार खेपेतच केलेल्या मालीशमुळे रुग्णांना हाड व स्नायूसंबंधी सगळ्या प्रकारच्या व्याधी, सांधेदुखी, अंग दुर्बलता, स्नायूविकार आदींसाठी हे उपचार लाभदायी ठरू लागल्याने अप्पांची कीर्ती सर्वदूर पसरली. मात्र, प्रसिद्धीपासून ते नेहमीच चार हात लांब राहिले. मालीशद्वारे मुडदूस, गुडघेदुखी, गुडघे प्रत्यारोपण, संधीवात, कावीळ, नागीण आणि मान व पाठीच्या कण्यात ‘गॅप’ तसेच मोडलेली हाडे जुळवण्यासोबतच अशाच इतर काही आजारांतून हमखास बरे करण्याचा जणू रामबाण उपाय स्वामीभक्त असलेल्या अप्पांकडे होता. त्यामुळेच अप्पांकडे उपचारासाठी ‘सेलिब्रिटी’चींही रेलचेल असायची. यामध्ये प्रख्यात अभिनेते निर्माते महेश मांजरेकर, अंगद म्हसकर, संजय नार्वेकर अनेक मालिकांमधील कलाकार ’जीम ट्रेनर’, खेळाडू, इतकेच काय तर अनेक डॉक्टरही अप्पांकडे उपचारासाठी येत असत. स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असल्याने अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि कोकणात वेंगुर्ला येथील मठातही अप्पांनी वारी केली. इथेही अप्पांची ‘डिस्पेन्सरी’ सुरू व्हायची. उपचारासाठी त्यांना साधे तिळाचे तेल आणि लेप लावण्याचा डबा इतकीच काय ती वैद्यकीय सामग्री लागायची. त्यामुळे अप्पा जिथे कुठे असतील, तिथे त्रासलेल्या रुग्णाला साध्या मालीशनेच अगदी लिलया बरे करत.
 
 
 
लहानपणापासूनच चिकित्सक आणि कुशल असलेले अप्पा १९७४ मध्ये ‘बेस्ट’मध्ये बसचालक म्हणून रूजू झाले. तेथे कबड्डी व खो-खोच्या क्रीडाप्रकारात अप्पांनी आपला ठसा उमटवला होता. परंतु, काही कारणांनी ही नोकरी सोडून १९८० साली त्यांना ‘एअर इंडिया’च्या सेवेत ‘एक्स सर्व्हिसमन डिपार्टमेंट’मध्ये ‘मेकॅनिकल’ म्हणून संधी लाभली. लग्न झाल्यावर १९८४ ला मुलुंड गवाणपाड्यात वास्तव्यास आल्यावर तेथील ‘मुलुंडचा राजा’ या प्रख्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीची धुरा कायम अप्पांकडेच होती. नाना कला आणि कसब अंगी बाणवलेल्या अप्पांनी उत्सवांच्या सजावटीबरोबरच ‘प्लम्बिंग’, ‘वायरिंग’, जलवाहिनीची कामे, पाण्याच्या टाक्या बसवणे, गॅरेजच्या कामांसोबतच वैद्यकीय सेवेलाही जुंपून घेतले. त्यांचा हातगुणच असा होता की, अनेक उपचारांनंतर त्यांच्याकडे आलेला रुग्ण समाधानी होऊनच परतत, अशी त्यांची ख्याती होती. ‘कोविड’ काळातदेखील त्यांनी कशाचीही तमा न बाळगता रुग्णांची सेवा केली.
 
 
 
अप्पांकडे कोणतीही वैद्यकीय अथवा औषधशास्त्राची पदवी अथवा प्रमाणपत्र नव्हते. तरीही ते रुग्णांसाठी बहुगुणी ठरले. किंबहुना काही होतकरू युवांनाही त्यांनी प्रशिक्षित केले. त्यांच्या पत्नीने मात्र ‘आयुर्वेद थेरपिस्ट’ (पंचकर्म) पदवी संपादन केली असून मुलगी श्रद्धा हिनेही ‘एमएससी’नंतर ‘नेचरोपॅथी’ कोर्स पूर्ण केला आहे. अप्पांच्या पश्चात रुग्णसेवेचा हा वारसा या मायलेकींनी यशस्वीपणे सांभाळण्याचा निर्धार केला आहे. आपल्या जादुई हातांनी मालीश करून सामान्य नागरिकांपासून ‘सेलिब्रिटीं’ना बरे करणारे अप्पा नुकतेच निवर्तले. देहाने जरी अप्पा आपल्यात नसले तरी त्यांच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी चिरंतन आहेत. अशा या हरहुन्नरी धन्वंतरी अप्पांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण आदरांजली!
 
 
 

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले. राष्ट्रीय माध्यमांवर पाक व्याप्त काश्मीर येथे हमास या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन बाबत बातम्या आल्या. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ला हमास स्टाईल असल्याचे वृत्त झळकले. पुढे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे हवाई हल्ले करून उडवले. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. दि. १० मे २०२५ रोजी BDS movement नावाने काही संशयित लोकांनी कर्वेनगर भागात पॅलेस्टीन समर्थनार्थ ..

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति'

काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु ..

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं,

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं, 'त्या' पाकिस्तानच्या किराना टेकड्यांचं गुपित नेमकं काय?

(Pakistan Kirana Hills) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले जे भारतीय हवाई दलाने परतवून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर अश्या चर्चा सुरु होत्या की, भारताने फक्त हवाई तळच नव्हे तर पाकिस्तानची अणुभट्टी 'किराणा हिल्स'वर ही लक्ष्य केले. मात्र भारतीय हवाई दलाचे डीजीएओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121