नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसातील हिंदूंचे महत्वाचे श्रद्धास्थान असलेले नीलमणी दुर्गा देवीचे मंदिर रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली उध्वस्त करण्यात आले आहे. हा प्रकार अहिंदू जगनमोहन रेड्डी सरकारने जाणीवपूर्वक केला असून याद्वारे राज्यातील हिंदूंचा अपमान करण्याचा हेतू आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश सह – प्रभारी सुनील देवधर यांनी मंगळवारी केला.
आंध्र प्रदेशात हिंदू विरोधी कृत्यांविरोधात भाजप नेते सुनील देवधर आवाज उठवत आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पथपटनम येथील नीलमणी दुर्गा देवीचे उध्वस्त करणे हा हिंदूंचा अपमान असल्याची घणाघाती टिका सुनील देवधर यांनी केली. ते म्हणाले, नीलमणी दुर्गा देवीचे मंदिर हे उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसातील सश्रद्ध हिंदूंचे मोठे श्रद्धास्थान आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील अहिंदू जगनमोहन रेड्डी सरकारने रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली हिंदूंचे हे श्रद्धास्थान उध्वस्त केल्याचे देवधर यांनी म्हटले आहे.
In past, Anti-Hindu criminals (Still roaming freely) in Andhra Pradesh vandalised Idols & busts in temples.
भाजप या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देवधर यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, रस्ता रूंदीकरणासाठी मंदिराची जागा हवी होती, असे सांगितले जाते. मात्र, त्यासाठी प्रथम मंदिरास पर्यायी जागा देणे, स्थानिक हिंदूंची संमती घेणे आणि त्यानंतर विधीवत पद्धतीने मंदिरातील मुर्तींचे स्थानांतरण करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने मंदिराच्या आवारातील हनुमानाची मूर्ती उध्वस्त करण्यात आली आहे. याद्वारे जगनमोहन रेड्डी सरकारने आपला हिंदूविरोधी अजेंडा स्पष्ट केल्याचेही देवधर यांनी यावेळी नमूद केले.