चंदेरी पडदया कडे प्रेक्षकांची पाठ
सिनेमागृहाच्या तिकीट बारीवर शुकशुकाट
22-Oct-2021
Total Views | 135
डोंबिवली : डोंबिवलीत नाट्य गृहाचा पडदा शनिवारी उघडला जाणार असून नाटकाच्या तिकिटासाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी सिनेमा गृहाच्या तिकीटबारीवर शुकशुकाट दिसून येत आहे. सिनेमाकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. डोंबिवली पूर्व स्थानकाजवळ असणाऱ्या पूजा आणि मधुबन सिनेमा गृहात शुक्रवारी केवळ दोन जणांनी सिनेमाचे तिकीट खरेदी केले आहे.
कोरोनामूळे मधला काही काळ वगळता तब्बल दोन वर्षे नाटयगृह आणि सिनेमा गृह बंद होती. नाट्य गृहाचा पडदा शनिवारी उघडणार आहे. त्यामुळे डोंबिवलीत नाटकाच्या तिकिटासाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी सिनेमा गृहाच्या तिकीटबारीवर रसिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. डोंबिवली पूर्व स्थानकाजवळ असणाऱ्या पूजा आणि मधुबन सिनेमा गृहात शुक्रवारी केवळ दोन जणांनी सिनेमाचे तिकीट खरेदी केले आहे.
कोरोना विषाणूमुळे बंद असलेले सिनेमागृह शुक्रवारी पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र असे असले तरी कोरोना काळात डोंबिवलीतील १९५२ साली सुरू केलेले सर्वात जुने असणारे टिळक टॉकीज लॉक डाऊन दरम्यान बंद केल्याचे मालकांनी सांगितले. मात्र पूजा आणि मधुबन टॉकीज सुरू असून सध्या जेम्स बाँड यांचा नो टाईम तो डाय आणि वेनोन हे दोन इंग्रजी सिनेमे सुरू आहेत. या दोन्ही इंग्रजी सिनेमांकडे डोंबिवलीकरांनी पाठ फिरवली. ५ ऑक्टोबर रोजी अक्षय कुमार यांचा सुर्यवंशी हा सिनेमा झळकणार आहे. ज्याप्रमाणे डोंबिवलीकरांनी नाटकाला प्रतिसाद दिला त्याप्रमाणे सिनेमाला देणार का हे पहाणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाचे नियम पाळून सिनेमागृह सुरू
कोरोनाचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केले असून सिनेमागृहाच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने हे सिनेमगृह सुरू झाले आहे. सिनेमागृहाचे निर्जंतुकीकरण करून इंटरव्हल मध्ये देखील योग्य तो वेळ देण्यात येणे असल्याचे सांगण्यात आले.