‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाला’ : लोकनेता ते विश्वनेता

डॉ. अशोकराव कुकडे, विक्रम गोखले, सुनील देवधर आदींसह मान्यवरांचा सहभाग

    21-Oct-2021
Total Views | 104

Modi VIVEK _1  


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचे विविध पैलू उलगडणारा ’लोकनेता ते विश्वनेता’ हा सा. ‘विवेक’चा भव्य ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘विवेक’द्वारे ’राष्ट्रजागरण व्याख्यानमाला’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २९ ऑक्टोबर रोजी आयोजित या व्याख्यानमालेत डॉ. अशोकराव कुकडे, विक्रम गोखले, सुनील देवधर आदींसह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
 
 
संघ प्रचारक ते गुजरातचे मुख्यमंत्री ते लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान अशी थक्क करणारी वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या सात वर्षांत मोदी यांनी विदेशनीतीमध्ये केलेले काम, भारताची जागतिक स्तरावर उंचावलेली प्रतिमा यामुळे मोदी यांचे नेतृत्व आता ’विश्वनेता’ म्हणून निर्माण झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाची ही वाटचाल मांडणारा आणि त्यांच्या विदेशनीतीचे विविध पैलू उलगडणारा ’लोकनेता ते विश्वनेता’ हा ग्रंथ सा. ‘विवेक’द्वारे लवकरच प्रकाशित करण्यात येत आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘विवेक’द्वारे ’राष्ट्रजागरण व्याख्यानमाला’ या ‘ऑनलाईन’ व्हिडिओ कार्यक्रमाचे आयोजन दि. २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
 
 
लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक ’पद्मभूषण’ डॉ. अशोकराव कुकडे यांच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापुढील दिवसांत अनुक्रमे परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ‘एबीएम नॉलेजवेअर लि.’ चे संस्थापक-व्यवस्थापकीय संचालक प्रकाश राणे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार असून दि. २९ रोजी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. सदर कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता सा. ‘विवेक’च्या ‘फेसबुक पेज’ व युट्यूब’ चॅनेलवरून ही व्याख्यानमाला प्रसिद्ध होणार आहे.
 
 
‘राष्ट्रजागरण’ व्याख्यानमालेत आभासी सहभागी होण्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक, वाचक-दर्शकांनी सा. ‘विवेक’च्या ‘फेसबुक पेज’ व ‘युट्यूब’ चॅनेलला ‘लाईक’ व ‘सबस्क्राईब’ करावे, असे आवाहन सा. ‘विवेक’द्वारे करण्यात आले आहे.
 
 
 
लोकनेता ते विश्वनेता
 
 
स्वामी विवेकानंदांनी विश्वगुरू भारताचे स्वप्न त्या काळात भारतीयांसमोर मांडले. आज एका संन्यासी ’नरेंद्रा’चे स्वप्न ’राजयोगी’ नरेंद्र साकार करताना दिसत आहेत. भारताच्या विदेशनीतीला नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत दिलेला आकार सा. ‘विवेक’च्या ’लोकनेता ते विश्वनेता’ ग्रंथातून शब्दबद्ध होत आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची मुलाखत, परराष्ट्र राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग, माजी ‘आयएफएस’ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, नवदीपसिंग सुरी, अशोक सज्जनहार तसेच खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, सचिन चतुर्वेदी आदी मान्यवर तज्ज्ञांचे लेख या ग्रंथात समाविष्ट असतील. या ग्रंथाच्या नोंदणीकरिता सा. ‘विवेक’च्या https://www.evivek.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन ग्रंथाची अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन सा. ‘विवेक’द्वारे करण्यात आले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121