‘एससी एसटी फोरम’च्या अहवालातील निरीक्षण; आंध्रप्रदेशातील प्रकार
अमरावथी : आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्यांसोबत पोलिसांचीही हातमिळवणी असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण ‘एससी एसटी फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. ‘एससी एसटी फोरम’च्या या अहवालानंतर आंध्रप्रदेशसह देशभरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
‘एससी एसटी फोरम’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वनवासी पाड्यांमधील गोरगरिबांचे काही धर्मियांकडून जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. ही धर्मांतर प्रक्रिया पार पाडताना वनवासी पाड्यांतील अनेक गोरगरिबांना स्वाक्षर्या करण्यासाठी धर्मांतर करणार्यांकडून धमकावले जाते.
जोरजबरदस्तीने धर्मांतर करणार्यांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवल्यास याप्रकरणी दादही मिळत नाही. कारण अनेकदा पोलीस कर्मचारीच विविध कार्यालयीन प्रक्रियेच्या नावाखाली या ना त्या मार्गाने वनवासी पाड्यातील गोरगरिबांच्या स्वाक्षर्या धर्मांतर करणार्यांना उपलब्ध करून देत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आल्याचे ‘एससी एसटी फोरम’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
पोलीस कर्मचार्यांकडूनही धर्मांतरासाठी अनेकदा स्वाक्षर्या करण्यासाठी धमकावण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचे ‘एससी एसटी फोरम’ने आपल्या अहवालात अधोरेखित केले आहे. ‘एससी एसटी फोरम’च्या या अहवालानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.