रायपूर : कवर्धा हिंसाचार प्रकरणात आता भाजपने राज्याचे मंत्री मोहम्मद अकबर यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणाची सरकार एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भूपेश बघेल सरकारचे परिवहन मंत्री मोहम्मद अकबरच या प्रकाराला जबाबदार आहेत, असा थेट आरोप लावा जात आहे. या प्रकाराला उत्तर देताना बघेल यांची जीभ घसरली असून त्यांनी रा.स्व.संघाची तुलना थेट नक्षलींक्षी केली आहे.
आपल्या मंत्र्याचे या प्रकरणात नाव आल्याने बघेल यांचा तोल ढासळला आहे. बघेल म्हणाले, ज्या प्रकारे छत्तीसगडमध्ये सक्रीय नक्षलवादी दूसऱ्या राज्यांतून इथल्या राज्यातून नेटवर्क हाताळले जाते तसेच छत्तीसगडच्या संघातील स्वयंसेवकांना नागपूरातून संचालित केले जात असल्याची तुलना त्यांनी केली.
कवर्धा हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचा आरोप भाजपने लावला आहे. कवर्धा प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. भाजपने या प्रकरणात अनुसुइया उइके यांनी पत्राद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.