सप्टेंबर महिन्यात 1,17,010 कोटी रुपये जीएसटी संकलन

    01-Oct-2021
Total Views | 79
gst_1  H x W: 0

सप्टेंबर २०२० च्या तुलनेत 22 टक्क्यांची वाढ
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सप्टेंबर 2021 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,17,010 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 20,578 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 26,767 कोटी रुपये, आयजीएसटी 60,911 कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 29,555 कोटी रुपये) आणि अधिभार 8,754 कोटी रुपये ( यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 623 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
 
 
सरकारने आयजीएसटीमधून 28,812 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 24,140 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, सप्टेंबर 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी 49,390 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 50,907 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
 
 
गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2021 मध्ये 23% अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 30% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 20% अधिक राहिला. सप्टेंबर 2019 मध्ये संकलित 91,916 कोटी रुपयांचा महसूल लक्षात घेतला तर यावर्षीचे महसूल संकलन गेल्या वर्षीपेक्षा 4 टक्क्यांनी जास्त आहे.
विद्यमान वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मासिक सरासरी जीएसटी संकलन 1.15 लाख कोटी रुपये झाले आहे आणि हे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत संकलित झालेल्या 1.10 लाख कोटी रुपयांच्या एकूण मासिक सरासरी संकलनाहून 5% अधिक आहे.
 
अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल संकलन वाढविण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहील आणि या वर्षीच्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये याहून अधिक जीएसटी महसूल संकलन होईल अशी अपेक्षा आहे.
 
राज्यांच्या जीएसटी महसुल संकलनात येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी 22,000 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई देखील दिली आहे. सप्टेंबर 2020 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 13,546 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर सप्टेंबर 2021 मध्ये 16,584 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात 22% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121