गडचिरोलीमध्ये दोन तरसांचा विषबाधेमुळे मृत्यू ?

    07-Jan-2021
Total Views | 135

wildlife _1  H


पोर्ली वनपरिक्षेत्रातील घटना

मुंबई (प्रतिनिधी) - गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी दोन तरस मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासणीनंतर या तसरांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ली वनपरिक्षेत्रातील खरपी आणि टेंभा चक गावाला लागून असलेल्या जंगलातून आज सकाळी दुर्गंध येत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी त्यांना तरसाचा मृतदेह आढळून आला. तिथून जवळपास साधारण दोनशे मीटर अंतरावर दुसऱ्या एका तरसाचा मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला कळवली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही तरसांच्या मृतदेहांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह जाळण्यात आले. या तरसांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालामधून खरी माहिती समोर येईल. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121