तिरंगा ध्वजाच्या साक्षीने सामूहिक राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणत व्यक्त केला आदर
औरंगाबाद: प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र, औरंगाबादमधील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
येथील नागरिकांनी तिरंगा ध्वजाच्या साक्षीने सामूहिक राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणत राष्ट्रध्वज व देशाविषयीचा आदर आणि सन्मान व्यक्त केला. गुरुवार दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील क्रांतिचौकाजवळील स्वातंत्र्यसंग्राम स्मारक येथे शहरातील नागरिकांनी राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणत त्याविषयीचा आदर व राजधानी दिल्ली येथे घडलेल्या घटनेबद्दल आपला रोष व्यक्त केला.
या उपक्रमासाठी औरंगाबाद शहरातील निखिल उर्हेकर, शैलेश पवार, राजेश पोतदार, रवी संघई, गणेश कुलकर्णी, विवेक बाप्ते, मनोज निळे, सागर शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला.