जॉब द्या; अन्यथा माझं लग्न एखाद्या मुलीशी करून द्या

    12-Jan-2021
Total Views | 103

uddhav thakare_1 &nb



मुख्यमंत्र्यांना वाशीम जिल्ह्यातल्या तरुणाचे पत्र



मुंबई: सरकारकडून वेळेवर न होणाऱ्या नोकर भरतीमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे अडचणीत सापडलेल्या तरुणांची व्यथा मांडणारे पत्र वाशिमच्या एका तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र गजानन राठोड या तरुणाने उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. "मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या" अशी मागणी या पत्राद्वारे तरुणाने केली आहे.


माझं वय ३५ वर्ष असून, माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या ७ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला कुठेही नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे, अशी तक्रारवजा खंत व्यक्त केली आहे.



यासगळ्यामुळे "आपण मला एकतर जॉब द्या; अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्या" अशी विनंतीदेखील या मुलाने केली आहे. राज्यभरात गजाननप्रमाणेचं असंख्य मुलांची अगदी हीच समस्या आहे. आणि या सगळ्या तरुणांचे अगदी तंतोतत प्रतिनिधित्व करणारे विचार या पत्राद्वारे मांडले गलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्यातल्या या सामान्य तरुणाचे पत्र गांभीर्याने घेतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121