'अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. ना डरूंगी, ना झुकूँगी'...

    09-Sep-2020
Total Views |

kangna_1  H x W



मुंबई :
शिवसेनेला मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असे खुले आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईला येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कंगनाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तणावपूर्ण स्थिती आहे



कंगनाने मुंबईत येण्यापूर्वी ट्विट करत ती म्हणाली,"राणी लक्ष्मीबाई यांच्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाला मी चित्रपटातून जगले आहे. मात्र, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जात आहे. मी राणी लक्ष्मीबाई यांच्या पावलावर पाऊल टाकून घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात नेहमी खुलेपणाने विरोध करेल. जय महाराष्ट्र, जय शिवाजी". मंडीहून चंदीगडला जाताना कंगनाने हमिरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात थांबून दर्शन घेतले.कंगना रनौतच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला. यानंतर कंगना सकाळी रस्त्याने मंडीहून चंदीगढला जात आहे. त्यानंतर ती विमानाने चंदीगडहून मुंबईला येईल. आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी तिची फ्लाईट आहे. दरम्यान याआधी कंगनाचे कोरोना चाचणीसाठीच्या सॅम्पलमध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा तिचे कोरोना चाचणीसाठीचे नमुने घेण्यात आले.अशातच कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121