पुण्याचे महापौर पीपीई घालून थेट 'जम्बो'मध्ये पाहणीला

    08-Sep-2020
Total Views | 58


पुणे _1  H x W:


पुणे :
जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कोरोना उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे जम्बोतील आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली. म्हणूनच जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे? इथली यंत्रणा कशी आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ थेट जम्बो रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या आहेत. आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील करण्यात येणार आहे.


murlidhar mohol_1 &n

यावेळी त्यांनी पीपीइ किट घालून जम्बोमध्ये जात सद्यस्थितीत १७८ रुग्ण उपचार घेत असणाऱ्या काही रुग्णांना भेटून त्यांच्याशी सोई-सुविधा आणि उपचारांबद्दल चर्चा केली. यामुळे रुग्णांमध्ये समाधान असल्याची परिस्थिती निर्माण होत असून याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध केली असून नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते असेही त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी उपलब्ध औषधे आणि ऍम्ब्युलन्स सुविधा याची माहिती त्यांनी घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिलं जाणाऱ्या जेवणाच्या स्थितीची पाहणी केली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र असल्याचे त्यानी नमूद केले.


पुणे _1  H x W:

येत्या दोन दिवसांत आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असून आयसीयू बेड्सची संख्या ६० पर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121