न्यूयॉर्क : प्रख्यात लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे याचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले आहे. मीना देशपांडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र स्थानिक वेळेनुसार ६ सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या चार दिवसांपूर्वी त्यांच्या थोरल्या भगिनी शिरीष पै यांची पुण्यतिथी होती.
मीना देशपांडे या ज्येष्ठ या महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. कवी-लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मीना देशपांडे यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली आहे.
आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे ‘अश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा-कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले.