धक्कादायक! रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

    07-Sep-2020
Total Views | 67
Nitin Adyalkar_1 &nb
 
 
  
नागपूर : नितीन अड्याळकर या नागपूरमध्ये राहणाऱ्या कोरोनाग्रस्त तरुणाचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाला आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता, अशी खंत त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. नितीन यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी कुटूंबाने हालचाल केली मात्र, ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका नसल्याने त्यांचा जीव गेला असल्याचा आरोप कुटूंबीयांनी केला आहे.
 
नितीन यांची प्रकृती खालावल्यानंतर कुटूंबियांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली परंतू काहीच उपयोग झाला नाही. १०८ क्रमांकावरून आलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन पुरवठा नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अड्याळकर कुटूंबियांनी मनपा इंदिरा गांधी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आदी ठिकाणी फोन केले. तब्बल साडे तीन तासांनी शासकीय वैद्यकीय रुग्णवाहिका आली.  
 
रुग्णवाहिकेत त्यांची तपासणी करण्यात आली असता तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही रुग्णवाहिका वेळेत पोहोचली असती तर आमचा मुलगा वाचला असता, असा आरोप कुटूंबियांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि रुग्णवाहिके अभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. मात्र, आठवड्याभरानंतर पुन्हा तोच प्रकार घडला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121