महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं?

    04-Sep-2020
Total Views | 140

kangana_1  H x


मुंबई :
कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील सोशमीडिया वॉर चांगलेच रंगले आहे.मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या या आव्हानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. शिवाय मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर तिला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही टीकेचा सामना करावा लागला. याचाच समाचार घेत शिवसेनेला आव्हान देताना महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? असा सवाल तिने केला.



तिनं ट्विट केलं की,''इंडस्ट्रीच्या शंभर वर्षांच्या इतिहासात मराठी योद्ध्यांवर एक चित्रपट बनवायची यांची औकात नाही. मुस्लीमांचे वर्चस्व असलेल्या या इंडस्ट्रीत मी माझ्या जीवावर आणि कारकीर्द धोक्यात टाकून शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला. आज मी महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारते की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?" पुढे ती म्हणते,''महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. ज्यानं मराठी अभिमान जपला आहे, हा महाराष्ट्र त्यांचा आहे. मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?'' असे म्हणत तिने पुन्हा एकदा तिच्यावर टीका करणाऱ्यांना आव्हान दिले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121