पर्यावरणीय बदलांच्या ज्वालामुखीवर पाकिस्तान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


Pakistan_1  H x


पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७५व्या सत्राला संबोधित करताना जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय बदल यावर भाष्य केले खरे. पण, या समस्यांमुळे त्यांच्या देशातील परिस्थिती किती बिकट झाली आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...


कराची हे पाकिस्तानमधील सर्वात प्रमुख महानगर, सर्वात मोठे वाणिज्य केंद्र आणि आर्थिक राजधानीचे शहर मानले जाते. ‘रोशनी के शहर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या कराचीला पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा कणा म्हणता येईल. कारण, देशाच्या जीडीपीत जवळपास २५ टक्के आणि केंद्रीय कर महसुलात ५५ टक्क्यांचे योगदान एकटे कराची देते. १९४७ साली भारताची फाळणी झाली. पाकिस्तान अस्तित्वात आला. त्यानंतर सुरुवातीला देशाच्या राजधानीचा बिरुदही कराचीने मिरवला. परंतु, फाळणीनंतर जवळपास दीड दशकांनंतर इस्लामाबादची स्थापना झाली व ते शहर पाकिस्तानची राजधानी झाले. अर्थात, इस्लामाबादने कराचीला राजधानीवरून पदच्युत केले आणि त्यानंतर या शहराची प्रचंड उपेक्षा झाली. केवळ उपेक्षाच नव्हे, तर तेव्हापासून मानवनिर्मित संकटांबरोबरच अनियमित पाऊस, अनावृष्टी आणि भयंकर पुरासारख्या आपत्तींशी कराची झुंजत आहे. नुकताच झालेला भीषण पाऊस आणि महापुराने ‘रोशनी के शहर’ नामक कराचीला जवळपास उद्ध्वस्त करून टाकले. महिनाभराआधी २७ ऑगस्टला कराचीमध्ये जवळपास नऊ इंच इतका पाऊस पडला आणि तो त्या शहरात एकाच दिवसात कोसळलेला सर्वाधिक पाऊस ठरला. हवामान खात्याच्या अधिकार्‍यांच्या मते, केवळ ऑगस्ट महिन्यात कराचीमध्ये १९ इंच इतका पाऊस पडला. जिथे पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नाही, कोणतीही आपत्कालीन प्रणाली आणि विश्वसनीय आरोग्य सुविधा नाही, अशा शहराला बुडवण्यासाठी हा पाऊस पुरेसा होता किंवा आहे. या अतिवृष्टीने गरिबांची हजारो घरे आणि वस्त्या नष्ट केल्या, तसेच १०० पेक्षा अधिकांचा बळीही गेला. कराचीतील या भयंकर संकटाने पुन्हा एकदा पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या इशार्‍याकडे लक्ष आकर्षित झाले. त्यानुसार पाकिस्तान जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या भीषण परिणामांसाठी संपूर्णपणे खुला किंवा ‘आओ जाओ घर तुम्हारा’सारखा असल्याचे म्हटले आहे. तथापि, हा धोका केवळ कराचीसारख्या किनारी प्रदेशापुरता मर्यादित नाही, तर पाकिस्तानच्या लाहोरपासून क्वेट्टा आणि इस्लामाबादपर्यंतच्या संपूर्ण प्रदेशावर हवामान बदलाचे गंभीर संकट घोंगावते आहे.
 
 
जागतिक तापमानवाढीचे कारण म्हणजे, वातावरणातील अत्याधिक हरित वायू उत्सर्जन. हरित वायू उत्सर्जनात चीन, अमेरिका आणि अन्य औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांचा मोठा वाटा आहे आणि पाकिस्तानसारख्या मागास देशाचा जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार अव्वल दहा देशांच्या यादीत समावेश नाही. परंतु, जागतिक तापमानवाढीने प्रभावित देशांच्या यादीत मात्र त्याचा सातवा क्रमांक लागतो. पाकिस्तानच्या हवामान बदलविषयक चिंतेत मान्सूनची वाढलेली परिवर्तनशीलता, सिंधू नदी प्रणालीवरील हिमालयीन हिमनद्या वितळल्याने निर्माण झालेली परिस्थिती, जलाशयांच्या क्षमतेतील कमतरता, दुष्काळातील जलविद्युत उत्पादनातील घट आणि पूर तथा दुष्काळासारख्या घटनांचा समावेश आहे. तसेच पाण्याची गंभीर कमतरता, शेती आणि पशुधनाच्या उत्पादनातील कमतरतेमुळे खाद्य असुरक्षा, अधिक प्रचलित किडी आणि तण, पारिस्थितीक तंत्राचे क्षरण, जैवविविधतेची हानी आणि काही बायोमचे उत्तरेकडील स्थलांतर हेदेखील हमामानबदलामुळे उद्भवलेले परिणाम आहेत. सोबतच उच्च तापमानामुळे मँग्रोव्ह संरचना, वितरण आणि उत्पादकतेलादेखील प्रभावित करू शकतात, तर कमी पाऊस मिठाच्या उत्पादनावर परिणाम करू शकतो.
 
 
‘युएन इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ने (आयपीसीसी) जागतिक तापमानवाढीवरील आपल्या विशेष अहवालात इशारा दिला होता की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास अत्यधिक उष्णता, समुद्रपातळीत वाढ, प्रचंड पाऊस, पूर, गंभीर दुष्काळ आणि अन्य गंभीर परिणामाला सामोर जावे लागेल. पाकिस्तानलादेखील या सगळ्याचेच नुकसान भोगावे लागत आहे. परंतु, वाईट व्यवस्थापकीय राजकीय अस्थितरता आणि धोरणात्मक दूरदृष्टीच्या अभावाशी झगडणार्‍या पाकिस्तानवर याचे परिणाम कित्येक पटीने भयंकर असतील. पाकिस्तानमध्ये सातत्याने पडणार्‍या दुष्काळ आणि अतिवृष्टीचा अतिरेक झाल्याचे दिसते. तसेच इथला पावसाचा वार्षिक पॅटर्न प्रभावित झाला आहे. सोबतच विकसनशील देश असल्याने शेती हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठे क्षेत्र आहे. शेतीचे देशाच्या सकल घरगुती उत्पन्नात २१ टक्के इतके योगदान असून ४५ टक्के श्रमशक्तीचे नियोजन शेतीतच होते. हवामानबदलामुळे मात्र, इथल्या शेतीचे मोठे नुकसान होताना दिसते. अतिवृष्टीमुळे गहू, तांदूळ, ऊस, मका आणि कापसासारखी प्रमुखे पिके नष्ट होत आहेत, जसे की सिंधमध्ये झाले होते. दुसरीकडे वार्षिक हवामानबदलाच्या पॅटर्नमुळे वार्षिक पाऊस, थंडी आणि उन्हाळ्याचे अचूक अंदाज वर्तविण्याच्या असमर्थतेने शेती अधिकच जोखमीची झाली आहे. याचा सर्वात वाईट परिणाम पाकिस्तानच्या ग्रामीण भागात होणार आहे. कारण, तिथले उपजीविकेचे मुख्य साधन शेतीच असून इथे देशाची ६३ टक्के लोकसंख्या वास्तव्यास आहे व त्यापैकी बहुसंख्य लोक दारिद्य्ररेषेखालील जीवन जगत आहेत.
 
 
पाकिस्तान एका बाजूला पाण्याच्या कमतरतेशी झगडत असतानाच दुसर्‍या बाजूला ‘जल प्लावन’ म्हणजेच अतिजास्त पाण्यामुळे संबंधित जलस्रोतांच्या बाहेर पाणी वाहण्याचा धोकादेखील वेगाने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्यांच्या वितळण्याची गती तीव्र झाली आहे. एका बाजूला हिमनद्या पाकिस्तानची जवळपास ७५ टक्के पाण्याची गरज भागवतात. पण, दुसरीकडे जागतिक तापमानवाढीमुळे त्यांचे रूपांतर नैसर्गिक आपत्तीत होत आहे, तर समुद्राची पातळी वाढतीच राहिली, तर या शतकाच्या अखेरीस जगातील अनेक किनारीप्रदेश धोक्यात येतील आणि पाकिस्तानमधील कराची, बादिन या किनारीप्रदेशावरही गंभीर परिणाम होईल. समुद्रपातळीतील वृद्धीमुळे समुद्राचे पाणी भूजलात प्रवेश करू शकते. परिणामी, समुद्राचे खारे पाणी भूगर्भात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते आणि यामुळे पेयजलाची संसाधने नष्ट होतील. हवामानबदलाच्या दृष्टीने पाकिस्तान जगातील पाचवा सर्वात धोकादायक देश आहे. ‘ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स’नुसार १९९८ आणि २०१८ दरम्यान देशात हवामानाशी संबंधित आपत्तीमध्ये जवळपास दहा हजार लोक मृत्युमुखी पडले आणि या कालावधीतील हवामानविषयक १५२ गंभीर घटनांमुळे जवळपास चार अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचे नुकसान झाले. विश्लेषकांच्या मते, गेल्या दशकात जवळपास तीन कोटींपेक्षा अधिक लोक हवामानबदलाच्या परिणामी आपले मूळ स्थान सोडून स्थलांतर करण्यासाठी अगतिक झाले.
 
 
आगामी ३० वर्षांमध्ये संपूर्ण दक्षिण आशियातील तापमानात ३.९ अंश फॅरनहाईट इतकी वाढ होण्याचा अंदाज असून या वाढत्या तापमानामुळे हिंदूकुश, हिमालय आणि काराकोरममधील हिमनद्या अधिक वेगाने वितळू लागतील. पूर्वानुमानानुसार उत्सर्जन सुरू राहिले आणि तापमानातील वाढही कायम राहिली, तर या पर्वतांवरील उपलब्ध बर्फाचा एक ते दोन तृतीयांश भाग २१०० सालापर्यंत पाण्यात रूपांतर होऊन वाहून जाईल. अर्थात, हे पाणी जिथून वाहू लागेल, निश्चितच तिथले परिणाम भयावह असतील.
 
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
 
 

@@AUTHORINFO_V1@@