एनसीबीच्या चौकशीत रकुलप्रीतचे धक्कादायक खुलासे !

    25-Sep-2020
Total Views | 49

Rakul Preet Sinha_1 
 
मुंबई : सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलीवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्यांना आणि निर्मात्यांना समन्स पाठवल्यानंतर चौकशीचे सत्र चालू आहेत. यामध्ये मोठमोठे खुलासे होत असल्याचे चित्र समोर येत आहेत. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सुरु असताना ड्रग्सचे मोठे जाळे एनसीबीच्या हाताला लागले आहे. यानंतर शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रीतची तब्बल ५ तास कसून चौकशी करण्यात आली.
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचौकशीमध्ये रिया चक्रवर्तीने ड्रग्स मागितल्याची कबुली तिने दिली असून आणखी ४ अभिनेत्यांची नावे या चौकशीत समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता आणखी काही सेलिब्रिटींना समन्स देण्यात येऊ शकतो. यामध्ये कोणाकोणाची नवे समाविष्ट आहेत हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. रकुलप्रीतच्या चौकशीमध्ये तिने रीयासोबत ड्रग्सबद्दल व्हॉटसअप चॅट केले असल्याचे कबुल केले आहे. मात्र, मी स्वतः कधीही ड्रग्सचे सेवन केलेले नाही असेदेखील तिने स्पष्ट केले आहे. तसेच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीदेखील एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121