बोरिवली 'नॅशनल पार्क'ची वाघ-सिंहांसाठी पुन्हा साद; 'सुलतान'ला प्रजननामध्ये अपयश

    22-Sep-2020   
Total Views | 174
tiger_1  H x W:


उद्यानातील वाघांच्या प्रौढ माद्यांसाठी प्रौढ नराची आवश्यकता

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) नागपूरहून आणलेला 'सुलतान' नामक नर वाघ प्रजनन करण्यामध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने पुन्हा एकदा वन विभागाकडे दोन वाघ देण्याची मागणी केली आहे. याशिवाय उद्यानात चार सिंह आणण्यासाठीही गुजरात प्रशासनाबरोबर पाठपुरावा सुरू केला आहे. 

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या 'गोरेवाडा बचाव केंद्रा'तून 'सुलतान' वाघाला नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. हा वाघ ५ वर्षांचा आहे. त्याला वन विभागाने चंद्रपूर जिल्हातून १२ जुलै, २०१८ रोजी मानव-वाघ संघर्षातून जेरबंद केले होते. या वाघाला नॅशनल पार्कच्या व्याघ्र विहारातील मादी वाघिणींसोबत प्रजनन करण्याच्या हेतूने मुंबईत दाखल करुन घेण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये 'सुलतान'ने येथील बिजली (९), मस्तानी (९) आणि लक्ष्मी (१०) या तीन वाघिणींसोबत मिलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न असफल ठरले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नॅशनल पार्क प्रशासनाने वाघांची मागणी केली आहे. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे वाघ आणि सिंहांसंदर्भातील मागणीपत्र मिळाल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'सुलतान' वाघापेक्षा या तिन्ही माद्या वयाने मोठ्या असल्याने त्यांच्यामध्ये मिलन झाले नाही. म्हणून आम्ही प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र लिहून दोन वाघांची मागणी केल्याची माहिती 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.



व्याघ्र विहारातील प्रौढ माद्यांसाठी
मानव-वाघ संघर्षातून पकडलेल्या प्रौढ नर वाघाची आणि 'सुलतान'साठी त्याच्या वयाच्या मादीची मागणी या पत्राव्दारे केल्याचे मल्लिकार्जुन म्हणाले. याशिवाय सिंहाच्या दोन जोड्या देण्याची मागणीही प्रशासनाने याच पत्राव्दारे केली आहे. सद्यस्थितीत उद्यानातील सिंह विहारात एक मादी आणि दोन नर सिंहाचे अस्तित्व आहे. मात्र, हे सिंह वृद्धापकाळामुळे प्रजननास सक्षम राहिलेले नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नॅशनल पार्क प्रशासन गुजरातच्या 'सक्करबाग प्राणिसंग्रहालया'कडे सिंह देण्याची मागणी करत आहे. परंतु, सक्करबाग प्रशासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे. अशा परिस्थितीतही आता प्रशासनाने वन विभागाच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर सिंह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.



अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121