चिंताजनक : मुंबईतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ!

    12-Sep-2020
Total Views | 25
Containment zone_1 &

११ दिवसांत १,२३५ इमारत, इमारतीचे भाग सील!

मुंबई : रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत असतानाच गणेशोत्सवानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीच्या कालावधीत घसरण होत असतानाच आता कंटेन्मेंटच्या झनच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.


सध्या रोज दोन हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. १ ते ११ सप्टेंबर दरम्यान तब्बल १,२३५ इमारती अथवा इमारतीचे भाग सील करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत इमारत अथवा इमारतीचे भाग सील करण्याची संख्या ७,५२८ वर पोहोचली आहे.


मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि पालिकेसह राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसताच लॉकडाऊनचे नियम हळुवार शिथिल करण्यात येत आहे. सध्या अनलॉक ४चा टप्पा सुरु असून मुंबई हळुवार पूर्ववदावर येत आहे. गणेशोत्सवापासून तर लोकांच्या, नातेवाइकांच्या भेटीगाठी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचे समोर येत आहे. एक हजार ते बाराशेच्या घरात मिळणाऱ्या रुग्णांचा आकडा थेट दोन हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत असल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, मुंबईत चाळी व झोपडपट्टी परिसरात कंटेमेंट झोनची संख्या घसरत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. १ सप्टेंबरला चाळ व झोपडपट्टी असे एकूण ५७७ प्रतिबंधित क्षेत्र होती. ही संख्या घटली असून चाळ व झोपडपट्टीत सध्या ५४४ प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मुंबईत कोरोना हा झोपडपट्ट्यातून हायराईज इमारतीत पसरत असल्याचे दिसून येते.






अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121