तब्बल आठवडाभर गायब झालेली रिया परतली!

    06-Aug-2020
Total Views | 127
rhea_1  H x W:


उद्या होणार ईडीकडून चौकशी!; सीबीआयकडून पुन्हा एफआयआर दाखल होण्याची शक्यता!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणी सतत वाढत आहेत. रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. न्यायालयात रियाच्या वकिलाने तिला काहीसा दिलासा मिळावा अशी मागणी केली पण कोर्टाने रियाला कोणतीही सूट देण्यास नकार दिला.


५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ईडीने रिया चक्रवर्ती यांच्याविरूद्ध समन्स जारी केले असून, ७ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे. तथापि, या सगळ्या दरम्यान रिया चक्रवर्ती कुठे गायब असावी, अस प्रश्न सर्वांनाच पडला होता. पाटण्यात सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी २५ जुलैला एफआयआर दाखल केला होता आणि त्यानंतर २७ जुलैला रियाचा वकील त्याच्या घराबाहेर दिसला आणि त्यानंतर रिया बेपत्ता होती. पण आता रिया आपल्या मुंबईतील प्राइम रोज अपार्टमेंटमध्ये परतली आहे. रिया तिच्या वकिलाच्या सांगण्यावरून परतली असल्याचे बोलले जात आहे. रिया २७ जुलैपासून आपल्या कुटुंबासमवेत फरार झाली होती.


रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी तक्रारीत सांगितलेल्या १५ कोटींच्या गैरव्यवहाराबद्दल ईडीनेही रियासह तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. उद्या म्हणजे ७ ऑगस्टला ईडी रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त ईडीने तिच्या सीएला समन्सही पाठवले आहेत.


आज ईडीने सुशांतच्या घरातील नोकर सॅम्युअल मिरांडाची चौकशी केली. त्यानंतर रियाच्या खार येथील फ्लॅटदेखील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या ताब्यात घेतला आहे. सोशल मीडियावर सुशांतच्या बँक खात्याचे काही स्टेटमेन्ट्स खूप व्हायरल होत आहेत. यात बहुतेक व्यवहार रियाच्या नावावर आहेत. रियाच्या शॉपिंग आणि मेकअपसाठी या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे म्हटले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121