'वादग्रस्त जागा' नाही तुमची पत्रकारिता आहे : शेफाली वैद्य

    05-Aug-2020
Total Views | 253
Ravish Kumar _1 &nbs




नवी दिल्ली : रामलला जन्मभूमीचा वादग्रस्त असा उल्लेख करणाऱ्या NDTVला लेखिका शेफाली वैद्य यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. वादग्रस्त जागा नाही तुमची पत्रकारिता आहे, असा टोला त्यांनी ट्विट करून लगालवला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी देत असताना हा उल्लेख केला होता त्यावरून त्यांनी सुनावले आहे.




शेफाली वैद्य म्हणाल्या, "एनडीटीव्ही ती जागा वादग्रस्त नाही, अधिकृत पुराव्यानुसार, आस्थेनुसार, ऐतिहासिक वारशानुसार, सामाजिकरीत्या, राजकीय दृष्टीने राम ललाचीच आहे. वादग्रस्त एकच गोष्ट आहे की, तुमची पत्रकारिता." रामजन्मभूमीला पुन्हा वादग्रस्त असा उल्लेख केल्याने ट्विटरवर याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. #NDTV या हॅशटॅग्सद्वारे व्यक्त होऊन यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. सोबतच भूमिपूजनचा उल्लेख ग्राऊंड ब्रेकींक सेरीमनी, असा करण्यात आल्यानेही त्यांनी फटकारले आहे. हा भूमिपूजन सोहळा आहे, हे लक्षात असू द्या, असेही त्या म्हणाल्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121