सुशांतचे पैसे, रियाची मौज!; बिहार पोलिसांची माहिती!

    04-Aug-2020
Total Views | 64
rhea_1  H x W:

सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ९० दिवसांत रिया चक्रवर्तीने खर्च केले ३ कोटी रुपये!


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. सुशांतचे वडिल के.के.सिंह यांनी पाटणामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले. बिहार पोलिससुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सुशांतचे बँक अकाउंटदेखील तपासले जात आहेत. रिया आणि तिच्या कुटूंबियांवर मनी लाँडरिंगची केस दाखल करण्यात आली आहे. सुशांतच्या खात्यातून रियाने ९० दिवसांत तब्बल 3 कोटी रुपये खर्च केल्याचे यातून समोर आले आहे.


सुशांतच्या वडिलांनी देखील दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाच्या बँक अकाउंटमधून पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला होता, असे म्हंटले होते. यामुळे आता बिहार पोलिस याचाही शोध घेत आहेत. अलीकडेच ईडीने रिया आणि तिच्या कुटूंबाविरोधात तक्रार दाखल केली होती.


दरम्यान सुशांतच्या वडिलांना या प्रकरणी सीबीआय तपासणी करावीशी वाटत असल्यात ते त्यासाठी मागणी करु शकतात. आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी केलेली नाही. कारण बिहार पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यास सक्षम असल्याचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121