हायकमांडमुळे तीनदा हुकले पंतप्रधानपद ! शिक्षक, क्लार्क ते राष्ट्रपती

    31-Aug-2020
Total Views | 134
pranav mukharji 1 _1 
 



प्रणव मुखर्जी... भारतीय राजकारणातील एक असे नाव ज्याचा विरोधकही सन्मान करतात. एक क्लार्क आणि एक शिक्षक, राजकारण आणि राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अवघ्या देशाने पाहिला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत तीन वेळा अशा संधी आल्या, तेव्हा वाटले होते की, प्रणवदा पंतप्रधान होतील. मात्र, ते तीनही वेळा या शर्यतीत मागे राहिले. त्यांच्या कार्यक्षमतेचा अंदाज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या एका वाक्यातून येऊ शकतो. 


'मी ज्यावेळी पंतप्रधान बनलो त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि सामर्थ्यवान असे व्यक्ती प्रणव मुखर्जी होते. परंतू मी काय करू शकत होतो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी माझी या पदासाठी निवड केली होती.' पंतप्रधानपदासाठी प्रणवदांचे तीनवेळा नाव पुढे आले होते. मात्र, सत्तेच्या पटावर चालताना पंतप्रधान पद काँग्रेसकडून त्यांना मिळू शकले नाही.


१. इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये क्रमांक दोनचे मंत्री मात्र, पंतप्रधान झाले नाहीत. 


१९६९ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आग्रहाखातर प्रणवदा राज्यसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधी सरकारच्या रणनितींमध्ये महत्वाची भूमीका त्यांनी निभावली होती. त्यामुळेच त्यांची जागा कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. कॅबिनेटमध्ये आर. व्यंकटरामन, पी.व्ही. नरसिंम्हाराव, ज्ञानी जेहेल सिंह, प्रकाश संद सेठी आणि नारायण दत्त तिवारी, असे मातब्बर नेते होते. त्यातून प्रणवदांचे राजकीय वजन तेव्हापासून किती होते याचा अंदाज येईल. 


इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार म्हणून प्रणव यांचे नाव चर्चेत होते. मात्र, राजीव गांधींना पक्षाने निवडून दिले होते. डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूका झाल्या, काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या. मात्र, कॅबिनेटमध्ये प्रणवदांना जागा मिळाली. कॅबिनेटमध्ये जागा मिळाली नाही त्यानंतर त्यांनी एका पत्रकात लिहीले होते. मी कॅबिनेटचा हिस्सा नाही हे मला आता समजले आहे, पण या धक्क्यातून मी सावरलो आणि पत्नीसह टीव्हीवर शपथग्रहण सोहळा पाहिला. दोन वर्षांनंतर १९८६ मध्ये प्रणवदांनी बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना केली. तीन वर्षांनी राजीव गांधींनी समजूत काढल्यानंतर त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. 


२. दोन वर्षांनी पुन्हा पंतप्रधानपद हुकले


१९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली. निवडणूकीत काँग्रेसची सत्ता पुन्हा आली. त्यावेळी प्रणवदा पुन्हा पंतप्रधान होतील, या चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या तुलनेत दुसरा कुठलाही चेहरा केंद्रात नव्हता. मात्र, यावेळीही पंतप्रधान पदाची संधी हुकली. नरसिंम्हा राव यांना पंतप्रधान बनवण्यात आले. प्रणवदांना पूर्वी योजना आयोग उपाध्यक्ष आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्री खाते देण्यात आले.


३. २००४ मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान पदासाठी डॉ. मनमोहन सिंहांची निवड केली.

२००४ वर्ष उजाडले. काँग्रेसला १४५ जागा तर भाजपला १३८ जागा मिळाल्या. ही भाजपची हार मानण्यात आली होती. सोनिया गांधी स्वतः पंतप्रधान झाल्या असत्या मात्र, त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा प्रणवदांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, काँग्रेसने अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांची निवड केली. 


मनमोहन सिंहांच्या कॅबिनेटमध्येही दुसरा क्रमांक


२०१२ मध्ये मुखर्जी यांनी मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेट दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. प्रणवदांनी २००४ ते २००६ पर्यंत संरक्षण, २००६ ते २००९ पर्यंत परराष्ट्र आणि २००९ ते २०१२ पर्यंत अर्थमंत्रालय सांभाळले. या दरम्यान, लोकसभेचेही नेते होते. युपीए सरकारचे संकटमोचक, अशी ओळख बनली होती. २०१२ मध्ये पी.ए.संगमा यांनीही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज केला होता. प्रणवदांना ७० टक्के मते मिळाली आणि ते राष्ट्रपती बनले. 


राजकारणात येण्यापूर्वी होते क्वार्क आणि शिक्षक


प्रणवदा भारतीय राजकारणातील एक विद्यान व्यक्ती म्हणून सन्मानित झाले. यापूर्वी इतिहास, राजशास्त्र, कायदे आदी विषयांची पदवी त्यांच्याकडे होते. क्वार्क, पत्रकार, शिक्षण म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यात भूमिका बजावल्या होत्या. १९६९ मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आले. २००८ मध्ये त्यांना पद्म विभूषण आणि २०१९ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले होते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121