सलग दुसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी!

    29-Aug-2020
Total Views | 53

rhea chakraborty_1 &


रिया चक्रवर्ती सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे देत नसल्याची सूत्रांची माहिती!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज नववा दिवस आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची आज पुन्हा चौकशी केली जात आहे. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी सुरु आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी येताना आणि तेथून घरी परत जाताना रियाला सुरक्षा दिली जाणार आहे. तसे अपील सीबीआयने केली होती.


दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देखील आज रियाला चौकशीसाठी बोलवू शकतो. एनसीबीने मुंबईत २ ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांना अटक केली आहे. मात्र ही कारवाई कोणत्या प्रकरणात झाली आहे ते अद्याप समोर आलेले नाही.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केल्याच्या आठव्या दिवशी शुक्रवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीची १० तास चौकशी केली. सीबीआय समन्सनुसार रिया बँक खाती आणि इतर कागदपत्रांसह सकाळी ११च्या सुमारास चौकशीसाठी पोहोचली होती. सूत्रांनुसार, सीबीआयने रियाला सुशांतशी झालेली तिची पहिली भेट, घटनेआधी सुशांतशी झालेला वाद आणि पैशांच्या देवाणघेवाणीसह इतर अनेक प्रश्न विचारले. सुशांतचा फ्लॅटमेट राहिलेला सिद्धार्थ पिठानी, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा हेही चौकशीत सहभागी झाले होते. रिया रात्री नऊच्या सुमारास डीआरडीओ गेस्टहाऊसमधून बाहेर पडली. तेथून तिने सांताक्रूझ पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या सोसायटीत काही पत्रकारांनी केलेल्या गैरवर्तनाविरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांची एक टीम तिला घरी सोडायला गेली होती.



अग्रलेख
जरुर वाचा
अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121