हिंदू आस्थांची पायमल्ली अन् चिडीचूप मानवतावादी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2020   
Total Views |
Nikah agreement_1 &n
 
गणेशोत्सव सुरू आहे. जगभरातील भाविकांची आपल्या लाडक्या बाप्पाप्रति असलेली श्रद्धा, आस्था आणि परदेशात जाऊनही भारतीय संस्कृती न विसरण्याचे संस्कार पाहून उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही. परंतु, काही मुस्लीम राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंच्या आस्थेची पायमल्ली करण्याच्या घटनांकडे पाहिले तर सीएए कायद्याची गरज आपसूकच अधोरेखित होते.
 
 
आखाती देशांमध्ये हिंदूंच्या देवतांची विटंबना करण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. बहारीनच्या एका सुपर मार्केटमध्ये बुरख्यातील महिलांनी गणेशमूर्ती जमिनीवर फेकून त्याचे तुकडे तुकडे केले. चेहर्‍यावर कुठलाही तीव्र राग नाही का कसलाही संताप नाही. अगदी शांततेत या मूर्तींना खंडित करण्याचे काम आपल्या नासक्या बुद्धीने करत राहिल्या. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता, समाजात दुफळी निर्माण करणार्‍या अशा समाजकंटकांना सुबुद्धी देवो, अशी अपेक्षा सोडून एक हिंदू म्हणून आपण काही करू शकत नाही. दिव्य पांडे यांनी मात्र, या मूर्त्यांची मनोभावे पूजा करून विसर्जन करून जगाला भारतीय संस्कृती काय आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
 
 
दुसरी घटना आहे, शेजारच्या पाकिस्तानातली. एका विकसकाने ८० वर्षे जुने मारूती मंदिर जमीनदोस्त करून टाकले. सोबतच मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी राहणार्‍या २० हिंदू कुटुंबांना बेघर केले. त्यांचीही घरे तोडून टाकली. याबद्दल एक चकार शब्दही काढण्याची हिंमत ना पाकिस्तानींमध्ये आहे आणि नाही भारतातील सेक्युलॅरिझमची डोळ्यावर झापडं लावून बसलेल्या मानवतावाद्यांमध्ये... पोलीस दाखल झाले, कारवाईचा देखावा उभारण्यात आला. आता 80 वर्षे जुने मंदिर एका फटक्यात जमीनदोस्त करून तिथल्याच नागरिकांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. एकच चूक की, तुम्ही हिंदू आहात आणि दुसरी चूक म्हणजे मुस्लीम राष्ट्राचे नागरिक आहात.
 
 
तिसरी घटना. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका पीडितेला जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करून मुस्लीम तरुणाशी निकाह करण्यास भाग पाडण्यात आले. एका विवाहित युवकाने तिच्याशी जबरदस्ती धर्मांतरण करत दुसरा निकाह करून तिच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली. केवळ एका व्यक्तीच्या डोक्यात पिकणारी ही नासकी कल्पना नाही, यामागे संपूर्ण संस्थात्मक नियोजन आहे. राम बाईचा निकाह पीर जान आगा खान सरहांदी धर्मस्थळी मोहम्मद अब्दुल्ला याच्याशी तिच्या मनाविरुद्ध करण्यात आला. तक्रार करण्यास गेल्यावर तिला हाकलून दिले. एका कागदावर पुरावा म्हणून सही करून घेण्यात आली, त्यावर ती स्वतःच्या मर्जीने धर्मांतरण करून निकाह करत असल्याचे लिहिले होते. राम बाईचे यापूर्वीही लग्न झाले आहे, तिला मुलीही आहेत, भविष्यात त्यांच्याकडून कुठला त्रास नको म्हणून त्यांच्याही सह्या या त्याच कागदावर करण्यात आला.
 
 
हिंदू मुलींना जबरदस्ती धर्मांतरण करण्यास भाग पाडणार्‍या संस्था धर्मप्रसाराच्या नावाखाली हा मानवतेची पायमल्ली करणारा नंगानाच सुरू ठेवतात आणि त्यांना जाब विचारणारी कुठली मानवतावादी संघटना आहे ना कुठलीही कथित झापडं लावणारी ’सेक्युलर’ नेते मंडळी... या प्रकाराबद्दल एक पाकिस्तानी चळवळीतील कार्यकर्त्याने आवाज उठवला, पण तोही द. कोरियातून त्यामुळे तोही दबला जाईल, याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. मुलीच्या घरच्यांनी आता पोलीस तक्रार करणेही सोडून दिले. कारण, पोलीस आणि न्याययंत्रणा आपल्या विरोधातच निकाल देणार याची पूर्वकल्पना इतक्या वर्षांच्या अन्याय अत्याचारानंतर आली आहे. याबद्दल ना कुठल्याही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी बातम्या दाखवल्या ना कुठल्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना न्याय मिळेल, अशी पीडित कुटुंबाला आशाही नाही.
 
 
चौथी घटना याला जोडूनच... एक शीख महिला जगजीत कौर. निकाहनंतरचे नाव आशिया बीबी लाहोर. तिच्यावरही जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह करण्यात आला. महिला शिकली सवरलेली म्हणून न्यायासाठी आपल्या हक्कांसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे तिने ठोठावले. परंतु, तिचाही भ्रमनिरासच झाला. न्यायालयाने तिला मुस्लीम पतीकडे ज्याने तिचे जबरदस्ती धर्मांतरण केले, त्याच्याकडे उर्वरित आयुष्याची शिक्षा उपभोगण्यासाठी खुले सोडून दिले. वर्षभर न्याय मिळेल या आशेने ती एका शेल्टरहोममध्ये राहत होती. इतके सगळे झाल्यावर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करता येईल की नाही, न्यायाच्या लढाईत जगण्याची सर्व शक्ती आणि त्राण संपून जातात, मग ज्याने जबरदस्ती उचलून नेले, त्याच्यासमोर गुडघे टेकण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे एकविसाव्या शतकातील वास्तव आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@