रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल!

    21-Aug-2020
Total Views | 1010
rhea_1  H x W:


सुशांतचे घर सोडल्यावर रियाचा महेश भट्ट यांना मेसेज!

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून यासाठी अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. याच दरम्यान, दिग्दर्शक महेश भट्ट आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे व्हॉट्सअप संभाषण व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या या चॅटमध्ये सुशांतच्या मृत्यूच्या अवघ्या ६ दिवसांपूर्वी अर्थात ८ जूनच्या रात्रीचे संभाषण आहे. ही चर्चा त्या रात्री ७:४३ से ८:०८च्या दरम्यान झाली आहे. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून निघाली होती. यात महेश भट्ट यांनी रियाला आता मागे वळून पाहू नकोस असा सल्ला दिला होता.


सध्या या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रिया महेश भट्टसमोर स्वतःला त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या जलेबी चित्रपटातील आयशा असे उद्देशून बोलताना दिसून आले. तिने सुशांतचे घर सोडल्याचे सांगताच महेश भट्ट यांनी तिला आता मागे वळून बघू नकोस, तू धाडसी आहेस, मला तुझ्यावर गर्व आहे, अशा आशयाचा रिप्लाय दिला.


मुंबई पोलिसांनी रियाची चौकशी केली तेव्हा रियाने म्हटले होते की सुशांतने तिला घराबाहेर होण्यास सांगितले होते. कारण तिच्या वडिलांना हे नाते आवडले नाही. रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांनीच रियाला ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता. रियाने सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल इतरांना देखील सांगितल्याचे बोलले जात आहे. सुशांतची बहीण मीतूने दावा केला होता, की रियाने तिला फोन करून फ्लॅटवर बोलावले होते. मीतू जेव्हा फ्लॅटवर पोहोचली तोपर्यंत रिया तेथून निघून गेली होती.




अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121