आदित्यशी माझा काही संबंध नाही : रिया चक्रवर्ती

    18-Aug-2020
Total Views | 89
rhea_1  H x W:


वकीलामार्फत रियाने स्पष्ट केली आपली बाजू!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नाही. आदित्य ठाकरे यांना ना मी ओळखते, ना त्यांच्याशी कधी संपर्क आला. आदित्य यांच्याशी माझे फोनवर देखील बोलणे झाले नाही, असे रिया चक्रवर्तीने म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले होते.

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आपल्या वकिलांच्या मार्फत एक पत्र सादर केले आहे. या पत्रात रिया हिने आदित्य यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. यासोबतच रियाने असेही म्हटले आहे की, सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करण्यास माझा कोणताही विरोध नाही. परंतु, इथे मुद्दा कार्यक्षेत्राचा आहे. बिहार पोलीस ज्या पद्धतीने या प्रकरणावर आणि त्याच्या चौकशीवर दावा सांगतात तो चुकीचा आहे.


सुशांतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूने बॉलीवूड विश्व चांगलेच ढवळून निघाले आहे. सुशांतच्या कुटुंबियांसह काही कलाकारांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. याचा तपास सुरु असून, सुशांतची कथित मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. तर हा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे. त्यांची हत्या होऊ शकते, अशी अजब भीती सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंहने व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देण्यास नकार देत आहे, असा दावा केला. आमदार नीरज सिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचाही दावा केला आहे.







अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121