‘चिन्ना थाला’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

suresh raina_1  



एकाच दिवशी माही म्हणजेच महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यामुळे चाहत्यांनी या ‘जय-वीरू’ जोडीच्या क्रिकेटमधील असंख्य आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला.



विश्वचषक २०११ चा दुसरा क्वार्टर फायनल सामना. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियम. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना. ब्रेट लीकडून लाँग ओव्हरला एका डावखुर्‍या फलंदाजाने बॉल सरळ बाऊण्ड्रीच्या बाहेर टोलवला. या विश्वचषकानंतर बर्‍याच फलंदाजांनी फटके आणि धावा केल्याच्या बातम्या आल्या होत्या, सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या एका ओव्हरमध्ये पाच चौकार, धोनीचा विश्वविक्रमी षटकार, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सचिनने केलेले शतक हे सर्व असूनही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केले, ते सुरेश रैनाच्या ‘त्या’ एका षटकाराने. भारतीय संघातील या आश्वासक चेहर्‍याने शनिवार, दि. १५ऑगस्ट २०२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. सुरेश रैना हा भारतीय क्रिकेट संघातील यष्टिरक्षक फलंदाज होता. त्याची फलंदाजीची अनोखी शैली चाहत्यांना आणि संघाला आश्वासक विजयाकडे नेणारी होती. बॅटचे संपूर्ण वजन गुडघ्यासह क्रीजवर टेकवत समोरून येणार्‍या बॉलवर लक्ष केंद्रित करत फलंदाजीची एक खास शैलीच त्याने विकसित केली होती, ज्यामुळे चेंडू सरळ सीमारेषा ओलांडून बाहेर पडत. सुरेश रैनाची आई हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील तर वडील रेनीवरी या जम्मू-काश्मीरमधील. काश्मिरी पंडित अनेक वर्षे काश्मीरमध्येच वास्तव्यास होते मात्र कालांतराने उद्भवलेल्या वादांमुळे त्यांच्या कुटुंबाने काश्मीर सोडले. यामुळे सुरेश रैना याचा जन्म दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या मुरादनगर येथे २७ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला. त्यांना एकूण तीन भावंडं. दिनेश हा सुरेशपेक्षा आठ वर्षांनी मोठा असून तो शाळेत शिक्षक आहे. ३ एप्रिल २०१५ रोजी सुरेश रैनाचे लग्न प्रियांका चौधरी यांच्याशी झाले, त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव ग्रॅसिया रैना आहे.



२०००मध्ये, वयाच्या १४व्या वर्षी सुरेश रैनाने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि गुरु गोबिंदसिंग स्पोर्ट्स कॉलेज या शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तो लखनौला रवाना झाला. त्यानंतर २००२ मध्ये तो १६वर्षांतील उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आणि त्याने आपल्या कौशल्याने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे केवळ १५ वर्षांच्या या मुलाची निवड इंग्लंड येथे होणार्‍या १९ वर्षांखालील भारतीय संघात झाली. या संधीत सुरेश रैनाने १९ वर्षांखालील या संघात अर्धशतक ठोकले आणि २००२च्या उत्तरार्धात श्रीलंका दौर्‍यासाठी १७वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. फेब्रुवारी २००३मध्ये अवघ्या वयाच्या १६व्या वर्षी त्याने आसामविरूद्धच्या सामन्यात रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने फक्त एक सामना खेळला. २००३च्या उत्तरार्धात सुरेश रैनाची ‘अंडर-१९’ विश्वचषक स्पर्धेसाठी व आशियाई एकदिवसीय चॅम्पियनशिपमध्ये संघात निवड झाली. ज्यात त्याने तीन अर्धशतके झळकावली. संघातील या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्याला गावसकर शिष्यवृत्तीअंतर्गत अ‍ॅडलेड येथील ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. सुरेश रैनाने २९ जुलै २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, २००६च्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत खराब कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. २००८च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाने सुरेश रैनाला सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. २०१०मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात प्रवेश केला व पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने विश्वचषक २०११मध्येदेखील क्वार्टर फायनल आणि सेमी-फायनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. आयपीएलमधील सातत्याने चांगल्या कामगिरीमुळे त्याने २०१४ पर्यंत प्रत्येक हंगामात ४००हून अधिक धावा आणि पुढील तीन वर्षांत ३७४, ३९९ आणि ४४२ धावांचा विक्रम केला. रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याच्या नावावर शतकही आहे, जे त्याने २०१३मध्ये पंजाबविरुद्ध केले होते. २०१४च्या बांगलादेश दौर्‍यादरम्यान त्याने कर्णधार म्हणूनही काम पाहिले.


सुरेश रैना हा क्रिकेट खेळातील तिन्ही प्रकारांमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. आयपीएलच्या सर्व सीझन्समध्ये ४००पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रैनाने १८ कसोटी सामन्यांमध्ये २६.४८च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत, २२६ एकदिवसीय सामन्यात ३५.४१च्या सरासरीने त्याने ५ हजार, ६१५ धावा केल्या आहेत. टी-२० बद्दल सांगायचे तर त्याने ७८ सामन्यात १ हजार, ६०५ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रैना तीन हजार धावा नोंदविणारी एकमेव व्यक्ती आहे. टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात रैना हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. सर्वात युवा खेळाडू असणार्‍या सुरेश रैनाने भारतीय संघाचे नेतृत्व केले. झिम्बाब्वेविरुद्ध देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यावेळी त्याचे वय अवघे २३ वर्षे होते. भारतीय संघाने रैनाच्या फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने जिंकले आहेत, मैदानावर वेगवान कामगिरी करुन हरणार्‍या सामन्याला पुन्हा जिंकण्याकडे नेण्याची ताकद त्याच्यात होती. तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा एक लोकप्रिय चेहरा आहे. टी-२०स्वरूपाचा रैनाचा खेळ फुलत गेला आणि म्हणूनच त्याला कदाचित ‘मिस्टर आयपीएल’ची पदवी दिली गेली. अशा या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. एकाच दिवशी माही म्हणजेच महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या जोडीने निवृत्तीची घोषित केली. त्यामुळे चाहत्यांनी या ‘जय-वीरू’ जोडीच्या क्रिकेटमधील असंख्य आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला.

@@AUTHORINFO_V1@@