केरळ विमान दुर्घटना : बचाव पथकातील २० जणांना कोरोनाची लागण!

    15-Aug-2020
Total Views | 33
keral_1  H x W:


बचाव कार्यात सहभागी झालेल्या ६०० जणांना करणार क्वारंटाईन!


कोची : ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत भारतात परतणारे विमान कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरल्यामुळे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १२३ प्रवासी जखमी झाले. मात्र या दुर्घटनेनंतर मदतकार्य करण्यासाठी गेलेल्या तब्बल २० अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकारामुळे मदतकार्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तब्बल ६०० जणांना क्वारंटाईन करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.


बचावकार्य करताना एक मृत प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह, तर एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने खळबळ उडाली होती. यामुळे विमानातील प्रवासी आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. या चाचणी अहवालातून तब्बल २० अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


केरळच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाची अपघात झाला. या मिशनअंतर्गत दुबईत अडकलेल्या लोकांना भारतात परत आणले जात असताना लँडिंग करताना विमान रनवेवरुन घसरल्याने मोठी दुर्घटना घडली होती.


तसेच कोरोनाची लागण झालेले अधिकारी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याही संपर्कात आल्यामुळे त्यांनीही स्वतःला क्वारंटाईन केले आहे. आजच्या ध्वजारोहण समारंभालाही त्यांना उपस्थित राहता आले नसल्याने विजयन यांचे सहकारी के. सुरेंद्रन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.





अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121