कोलकाता : पश्चिम बंगालच्या 'बंगाल इमाम असोसिएशन'चा अध्यक्ष मोहम्मद याहियाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भाजप आणि रा.स्व.संघ मुस्लीमविरोधी आहेत. जे मुस्लीम भाजपत जातील त्यांनी स्वतः लक्षात घ्यायला हवे, त्यांच्याविरोधातही आवाज उठवला जाईल. जो मुस्लीम भाजपत जाईल तो मुस्लीम मानला जाणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मोहम्मदने केले आहे.
मोहम्मद याहिया यांनी गेल्या शनिवारी पत्र लिहून मुस्लीमांना धमकीच दिली आहे. भाजपत जाऊ नका, अन्यथा तुम्ही मुस्लीम राहणार नाहीत, असा इशाराच त्याने दिला आहे. यापूर्वीही इमामने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. ५ ऑगस्टपूर्वी झालेल्या राम मंदिर भूमिपूजनावरही प्रश्न विचारले होते. पुजाऱ्यांना कोरोना झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे भूमिपूजन करण्यास का गेले, असा सवालही त्याने उपस्थित केला होता.
यापूर्वीही ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनीही वादग्रस्त विधान केले होते. भूमिपूजनाच्या जागेवर मशिद होती आणि मशिदच राहणार, मंदिर बनले तर ते ध्वस्त करून मशिद बांधली जाईळ, असे विधान करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.