तपासात सहकार्य करत नसल्याने ईडीकडून कारवाई!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित आणि भाऊ शोविक यांची सुमारे साडेदहा तास चौकशी केली. सकाळी अकराच्या सुमारास ते ईडी कार्यालयात पोहोचले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. ईडीने रिया, तिचे वडील आणि भाऊ यांचे मोबाइल फोन आपल्या ताब्यात घेतले आहेत. तिन्ही फोनची तपासणी, चौकशी केली जाणार आहे. बुधवारी, त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
रिया चक्रवर्तीची दोनवेळा सुमारे १९ तास चौकशी झाली. त्याचवेळी तिचा भाऊ शौविकची तीन वेळा सुमारे ३३ तास चौकशी केली गेली. ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया आणि शौविक ईडीला तपासात सहकार्य करत नव्हते आणि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नव्हते. म्हणूनच त्यांच्या चौकशीसाठी इतका वेळ लागला.
या चाक्षी दरम्यान, रियाला सुशांतसोबतच्या नात्यापूर्वी आणि नंतर तिच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल विचारले गेले. तिला गेल्या काही वर्षातील चल मालमत्ता, दागदागिने, गुंतवणूक आणि विकत घेतलेल्या मालमत्तेचा हिशोब मागितला गेला. रियाचा भाऊ शौविक आणि वडील इंद्रजित यांना त्यांच्या कमाईबद्दल प्रश्न विचारले गेले. ईडी अद्याप या प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावे शोधत आहे.