मुंबई : मानखुर्द परिसरातील मशिदीच्या बाहेर लावलेल्या बेकायदेशीर भोंग्याविरोधात तेथील स्थानिक तरूणी करीश्मा भोसलेने आवाज उठवला आणि पोलिसांत रीतसर तक्रारही केली.पोलिसांनी मात्र "चोर सोडून सन्याशाला फाशी "या न्यायाने करीश्माच्या आईलाच नोटीसीद्वारे ताकीद दिली.विहिंपचे अॅड.कौशिक म्हात्रे यांनी डी.सी.पी.आणि स्थानिक पोलिस ठाण्यात उत्तरादाखल आपले म्हणणेही मांडले आहे.
या सर्व प्रकरणातील विशेष बाब म्हणजे सदर मशीद एका टोकाला आणि भोंगा आहे मशीदीपासून दीडशे मीटर लांब असलेल्या खांबाला. त्यामुळे सकृतदर्शनी सदर भोंगा हा अन्य धर्मीयांना त्रास देण्यासाठीच आहे असे दिसते. गेल्या दोन आठवड्यांपासून हे प्रकरण तापत आहे. स्थानिकांच्या कृती समितीनेही याबाबत आवाज उठविला आहे. तरीही स्थानिक पोलिस ठाण्याने बेकायदेशीर भोंगा काढण्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणूनच विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले.
रामचंद्र रामुका, मोहन सालेकर, श्रीराज नायर आणि अॅड.कौशिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात खालील माणण्या केल्या आहेत.
1) माननीय उच्च न्यायालयाच्या २०१४ मधील निर्देशानुसार भोंग्यावरून अजान देणे हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार होऊ शकत नाही.यास्तव मशिदीच्या बाहेरील भोंगा बेकायदेशीर असून तात्काळ उतरवण्यात यावा.
2) या प्रकरणात सर्वप्रथम आवाज उठविणारी तरूणी करीश्मा भोसले आणि कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे.
3) या सर्व घटनेची उच्चस्तरीय पोलिस अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी व्हावी.
अशाच प्रकारचे निवेदन मुबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंहजी यांनाही प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.परिषदेच्या कोकण प्रांताचे सचिव मोहन सालेकर आणि श्रीराज नायर पोलिस आयुक्तांना निवेदन देताना म्हणाले की,"पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी अन्यथा विहिंप आणि बजरंगदलाला या विषयावर आंदोलन करावे लागेल, असा इशारा विहिंप, कोकण प्रांत सहमंत्री श्रीराज नायर यांनी दिला आहे.