कोरोनानंतर आता क्रिकेटमध्ये नवी नियमावली... आयसीसीची नवी बंधने!

    08-Jul-2020
Total Views | 55

icc_1  H x W: 0
नवी दिल्ली : कोरोनामुळे जगभरातील क्रीडा विश्व स्तब्ध झाले होते. या महामारीनंतर आयसीसीने सर्व स्तरांवरील सामने रद्द केले होते. त्यानंतर आता तब्बल १२० दिवसानंतर ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला जात आहे. अद्याप कोरोनावर लस तयार नसल्यामुळे काही नियम आणि अटींसह पुढील सर्व सामने आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती यापूर्वीच आयसीसीने दिली होती. आता आयसीसीची नवी नियमावली जाहीर झाली असून काही बंधने खेळाडूंवर घालण्यात येणार आहेत.
 
काय आहेत नवे बदल ?
 
> कोरोना विश्वाणु हा संक्रमणाने पसरत असल्याने आता पुढील सूचनेपर्यंत क्रिकेटचे सामने हे विना प्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत.
 
> स्टेडीयमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले असून खेळाडूंनाही सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहेत.
 
> गोलंदाजांनी फलंदाजाला बाद केल्यानंतर पहिल्यासारखे सेलिब्रेशन करता येणार नाही. खेळाडू एकमेकांना एल्बो टच करू शकतात.
 
> सामने विना प्रेक्षक आयोजित करण्यात येणार असले तरी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या स्क्रीन लावून दर्शकांचा आवाजही येणार आहे.
 
> क्रिकेटमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गोलंदाजानं चेंडू चमकवण्यासाठी आता थूक लावता येणार नाही. जर खेळाडू असे करतील तर त्यांना ताकीद देण्यात येईल. सतत असे झाल्यास खेळाडूंना दंडही भरावा लागेल. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी आपल्या घामाचा वापर करू शकतात.
 
> एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याची बदली म्हणून दुसरा खेळाडू खेळवण्यात येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-२० सामन्यांसाठी लागू नसेल.
 
> प्रत्येक सामन्यासाठी स्थानिक पंचांची निवड केली जाईल.
 
> प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त डीआरएस दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन डीआरएस घेता येणार आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर घुसखोरी नेटवर्कचा मास्टरमाइंड चांद मियाँ अटकेत!

बेकायदेशीर घुसखोरी नेटवर्कचा मास्टरमाइंड चांद मियाँ अटकेत!

दिल्ली पोलिसांनी घुसखोरीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून मुख्य सूत्रधार चांद मियाँसह सहा बांगलादेशी घुसखोर आणि पाच भारतीय एजंटना अटक केली आहे. हे भारतीय एजंट बांगलादेशींना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचे, त्यांच्यासाठी बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवायचे आणि त्यांना आश्रयही द्यायचे. बंगाल आणि मेघालयातून बांगलादेशींना घुसखोरी केल्यानंतर, एजंट बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक करायचे. आरोपी चाँद मिया यांने दिल्लीत ३३ बांगलादेशींची भारतीय कागदपत्रांसाठी नोंदणी करून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121