‘पाणीपुरी’ला ब्रॅण्ड बनवणारा अभियंता!

    23-Jul-2020   
Total Views | 328
Chatar patar_1  





नोकरीसोबतच व्यवसायाचे स्वप्न त्याने पाहिले आणि ‘चटर-पटर’ म्हणत ते प्रत्यक्षात साकारही केले. ‘इन्फोसिस’ला ‘रामराम’ म्हणत चटपटीत ‘पाणीपुरी’चा ब्रॅण्ड तयार करणारा हा अभियंता म्हणजे प्रशांत कुलकर्णी...


पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटतं. आंबट-गोड-तिखट अशा वेगवेगळ्या चवींनी जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी बर्‍याचदा आजारपणाला कारणीभूत ठरते. ‘स्ट्रीटफूड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पदार्थाने अनेकांची पोटंदेखील बिघडवली आहेत. रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे अनेकदा अन्नविषबाधा होते. असेच एकदा प्रशांत कुलकर्णी यांच्यासोबत घडले आणि यातूनच सुरुवात झाली ‘हायजिनिक पाणीपुरी’ देणार्‍या ‘चटर-पटर’ची...


‘इन्फोसिस’मध्ये नोकरी हे प्रत्येक अभियंत्याचे स्वप्न. प्रशांत कुलकर्णी ही त्यांपैकीच एक. ‘इन्फोसिस’मध्ये उच्चपदावर कार्यरत असणारे प्रशांत खाण्याचेही तितकेच शौकीन! ‘स्ट्रीटफूड’ त्यातही पाणीपुरी हा त्यांचा अतिशय आवडता पदार्थ. कामाच्या ठिकाणाहून परतत असताना ते बरेचदा पाणीपुरीवर ताव मारूनच घरी जात. एकदा याच पाणीपुरीमुळे त्यांना ‘फूड पॉईझनिंग’ अर्थात अन्नविषबाधा झाली. या पाणीपुरीप्रेमामुळे प्रशांतना तब्बल चार महिने अंथरुणातच काढावे लागले. आपल्याला झालेला त्रास इतरांना होणार नाही, असं काहीतरी करायला हवं, हा विचार त्यांच्या मनात आला आणि याचवेळी त्यांनी एक निर्णय घेतला! हा निर्णय म्हणजे, प्रत्येक खवय्याला स्वच्छ आणि पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे एक माध्यम तयार करायचे.


‘बिझनेस’ची कल्पना तर डोक्यात आली. आता तो कसा करावा, यासाठी प्रशांतने रिसर्च सुरू केला. ‘ऑर्कुट’च्या माध्यमातून त्यांनी रिसर्च फॉर्म तयार केले. यातून निघालेल्या निष्कर्षावरून त्यांना बरीच मदत झाली. बाजारात अनेक सर्वोत्तम खाद्यपदार्थ पुरवणारे छोटे व्यावसायिक होते, मात्र त्यांना तितकीशी ओळख मिळाली नव्हती. बाजार सर्वेक्षणाअंती त्यांनी असा एक ब्रॅण्ड तयार करण्याचा निर्णय घेतला. यातूनच ‘चटर-पटर’ ब्रॅण्ड उदयास आला.


प्रशांतच्या या संकल्पनेला त्यांच्या पत्नीचा पाठिंबा होता. प्रशांत स्वतः एमबीए, तर त्यांची पत्नी आरती एमटेक होत्या. दोघांनी मिळून ही संकल्पना घरातल्यांना सांगितली. मात्र, चांगली नोकरी असणार्‍या आपल्या मुलाने असला काहीतरी व्यवसाय सुरु करावा, याला घरच्यांचा विरोध होता. ९ ते ५ अशा पारंपारिक वेळेत नोकरी करणार्‍या प्रशांत यांना बदल हवा होता. मात्र, तो असा असेल त्याची कल्पना कुटुंबाला नव्हती. ‘हा व्यावसाय चालणार नाही, तू दुसरे काहीतरी कर,’ असा सल्ला कुटुंबीयांनी दिला. प्रशांत मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. शेवटी कुटुंबीयांना त्यांच्या निर्णयातून माघार घ्यावीच लागली.


२०११ साली प्रशांत यांनी ‘चटर-पटर’ या पाणीपुरी ब्रॅण्डची सुरुवात केली. ३० हजार रुपयांनी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. ‘स्वच्छता’ आणि ‘पौष्टिकता’ या दोन निकषांना अग्रस्थानी ठेवून त्यांनी ‘हायजिनीक पाणीपुरी’ विकण्यास सुरुवात केली. या पाणीपुरीमध्ये केवळ मिनिरल पाणी वापरले, तर ‘चटर-पटर’ पाणीपुरी वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध करून दिली. या अनोख्या संकल्पनेमुळे आणि उत्कृष्ट चवीमुळे अल्पावधीतच त्यांचे स्टार्टअप प्रसिद्ध झाले. २०१२ पासून त्यांनी ‘चटर-पटर’ची फ्रेंचायझिंग करण्यास सुरुवात केली.


इंदौरमधून सुरु झालेला हा व्यवसाय भारतातल्या अनेक शहरांमध्ये पोहोचला. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी समान चव आणि व्यवसायाचे निकष मात्र तेच ठेवले. इंदौरमधून पॅकिंग होऊन हे पदार्थ इतरत्र विक्रीसही जातात. ‘चटर-पटर’च्या भारतभरात १०० हून अधिक शाखा आहेत, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ‘चटर-पटर’चा बोलबाला आहे. लंडन आणि ऑस्ट्रेलियामधूनही त्यांना ‘चटर-पटर’बद्दल विचारणा झाली.


‘पाणीपुरी’ला प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रशांत यांनी ८० प्रकारच्या वेगवेगळ्या भेळ आणि २७ प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे चाट खवय्यांच्या भेटीस आणले, तर ११२ प्रकारच्या चवीची पाणीपुरीही त्यांनी तयार केली. अनेक पाश्चिमात्य पदार्थही त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. याशिवाय ‘चटर-पटर’ची मॅगीही खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘बिग बाझार’सारख्या एका मोठ्या माध्यमाशी त्यांनी करारही केला. या करारानुसार त्यांचे पदार्थ हे ‘बिग बाझार’च्या सगळ्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले.


प्रशांतचा हा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी उच्चपदस्थ अभियंत्याने थेट चाकोरीबाहेरच्या व्यवसायात उतरणे यात धोका होता. त्यांच्या या संकल्पनेमुळे अनेकदा त्यांचे मित्रपरिवारात हसे झाले. या सगळ्यावर मात्र करत त्यांनी उद्योगाची सुरुवात केली. सुरुवात झाल्यानंतरही सामान, कच्चा माल, वेगवेगळ्या रेसिपी या सगळ्यांमध्ये त्यांना अडचणी होत्या. पाणीपुरी तर सगळीकडेच मिळते, आपण असं काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, जेणेकरून लोकांचे पाय आपोआप आपल्याकडे वळतील, हा विचार डोक्यात ठेवत कायम नवीन प्रयोग ते करत राहिले.


‘चटर-पटर’च्या पहिल्या दिवशी त्यांची कमाई केवळ २०० रुपये इतकीच होती. मात्र, आज त्यांच्या कंपनीचा सुमारे ८० कोटींचा टर्नओव्हर आहे. प्रशांत त्यावेळी आजारी पडले, पण त्यातूनही त्याने शिकून पुढे उद्योजक बनले. एक छोटीशी कल्पना किती मोठे काम करु शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘चटर-पटर.’




हर्षदा सीमा

'मुंबई तरुण भारत'मध्ये 'वेब उपसंपादक' (मनोरंजन) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी. गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रीय. कला, संस्कृती, मनोरंजन या विषयांशी संबधित लिखाणाची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात ..

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर हे नावच अधिक बोलकं!; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे नावच अधिक बोलकं!"; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121