नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात सोमवारी देशातील सर्वात पहिल्या स्वदेशी लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे. कोरोना चाचणी करण्यास परवानगी देण्यात आलेले दिल्ली एम्स रुग्णालय १४ संस्थांपैकी एक मानले जाते. आयसीएमआरने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी दिली आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ३७५ स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. यातील शंभर जण हे एम्समधील आहेात. यात काही आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांचा वयोगट हा १८ ते ५५ वर्षापर्यंत असणार आहे. हे असे लोक आहेत, ज्यांना अद्याप कोरोना संक्रमण झालेले नाही.
एम्सचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी पहिल्या टप्प्यात १८ ते ५५ वर्षांवरील व्यक्तींवर कोरोना लसीची चाचणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तींवर ही चाचणी होत आहे त्यापैकी कुणीही यापूर्वी आजारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लसीचे एकूण ११२५ नमुने आहेत. त्यापैकी ३७५ हे पहिल्या टप्प्यात वापरले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १२ ते ६५ वयोगटातील लोकांचा सामावेश आहे. त्यात ७५० जणांवर ही चाचणी केली जाणार आहे.
समुह संक्रमणाचा पुरावा नाही !
डॉ गुलेरिया म्हणाले, "कोरोना विषाणूच्या देशभरातील समुह संक्रमणाचा सध्या पुरावा आढळलेला नाही. मात्र, जिथे कोरोना हॉटस्पॉट आहेत. तिथे याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे." ज्या शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोना पसरत आहे, तिथे या पद्धतीचे संक्रमणाचा धोका नाकारला जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. दिल्लीतील काही भागांत कोरोना आकडेवारीत घसरण नोंदवली जात आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप कोरोनाचा फैलाव वाढण्याचीही भीती आहे, असेही ते म्हणाले.
कशी होतेय लसीकरणाची तयारी वाचा सविस्तर
जनावरांवर कोरोना लसीकरण पूर्ण
जेव्हापासून 'भारत बायोटेक'तर्फे कोरोना लसीच्या नावाची घोषणा केली जात आहे. त्यावेळपासून कोरोनावर ही लस किती प्रभावी ठरेल, असा प्रश्न विचारला जात आहे. या लसीवर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी, पुणे या दोन्ही संस्था काम करत आहेत. या लसीवर आयसीएमआरचे सेवानिवृत्त संशोधक डॉ. रमन आर गंगाखेडकर यांनी जनावरांवर याची चाचणी पूर्ण झाल्याचे सांगितले. आता मानवी शरीरावर याची चाचणी केली जात आहे, असे ते म्हणाले.
कसा होतो लसीकरणाचा अभ्यास ?
प्रसार भारतीला दिलेल्या माहितीत डॉ. गंगाखेडकर म्हणतात, मानवी शरीरावर कोरोनाच्या तीन चाचण्या होतात. पहिल्या टप्प्यात कोरोना लस ही मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का याचा अभ्यास केला जातो. याच दरम्यान, लस घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात लसीच्या अॅण्टीबॉडीज् तयार होतात का याचाही अभ्यास केला जातो. दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या दुष्परीणामांची चाचणी केली जाते. सहा महिने किंवा एका वर्षात लसीचे कुठले दुष्परीणाम जाणवतात का याबद्दलही चाचण्या केल्या जातात. तिसऱ्या टप्प्यात आजार पुन्हा बळावतो का संक्रमण होतो का याचाही अभ्यास केला जातो. चौथ्या टप्पा हा कोरोना चाचणीचा नसतो याचा सर्वसामान्यांवर लसीकरण सुरू केला जातो. तसेच पुढील दोन वर्षांत काहीच साईड इफेक्ट जाणवले नाहीत त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.
सर्वसामान्यांपर्यत कधी लस उपलब्ध होईल ?
कोरोना महामारीपूर्वी कुठल्याही प्रकारच्या लसीच्या चाचणीसाठी सात ते आठ वर्षे लागत असत. मात्र, कोरोना महामारी ज्या प्रकारे गतीने जगात पसरली त्यादृष्टीने विविध संस्था देशांनी आपापल्या पातळीवर लसीकरणाची मोहीम सुरू केली. १५ ऑगस्टपर्यंत या लसीची पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. लसीकरणात अॅण्टीबॉडीज् तयार होतात की नाही याचा तपास लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी केली जाणार आहे. तसेच याचे उत्पादनही वाढवले जाणार आहे. जर कोरोना लस पूर्ण झाली तर देशभरात कोरोना लस पोहोचवली जाईल.
चीन अमेरिकीची कोरोना लसही भारताच्या स्तरावर
डॉ. गंगाखेडकर यांनी कोरोना लसीकरणाची तयारी वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ५० लोकांवर चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात दोनशे ते अडीचशे लोकांवर याची चाचणी करते तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लोक यात सहभागी होत असतात. कोरोना चाचणीत अद्याप दोन लसी दुसऱ्या टप्प्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार झालेल्या लसीचे नाव केडॉक्स आहे दुसरी चीनची लस आहे जी सायनोवॅक कंपनी आहे. या दोन्ही लसी भारताच्या लसीच्या स्तरासारख्याच आहेत.