‘दिशा’ कायद्याचे पुढे काय झाले?’ : चित्रा वाघ

    18-Jul-2020
Total Views | 83

chitra wagh_1  


पनवेल क्वारंटाइन सेंटरमधील बलात्कारप्रकरणावरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल


मुंबई : पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाचं होती का? आम्ही सगळे वाट पाहत आहोत, या कायद्याचे पुढे काय झाले? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.





सदर घटनेनंतर चित्रा वाघ, किरीट सोमय्या आणि प्रशांत ठाकूर यांनी पिडीत महिलेची भेट घेतली. यासंदर्भात पोलीसांची भेट घेऊन लवकरात चौकशीसह, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. या दरम्यान त्यांनी माध्यमांशीदेखील संवाद साधला. ‘पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा कोरोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते? कोणीही येतात आणि डॉक्टर असल्याचे सांगत आत प्रवेश करतातच कसे’, असे सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.


या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेच जबाबदार आहे. त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121