डीसीजीआयची मंजूरीही मिळीली : जुलैमध्ये सुरू होणार चाचणी
नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना एक आशेचा किरण दिसून आला आहे. 'ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'तर्फे 'कोवॅक्सिन'ला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे ही देशातील पहिली कोविड-19 लस बनली आहे. मानवी शरीरावर प्रयोग करण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूरी मिळाली आहे. जुलैपासून याची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
भारतीय चिकित्सा अनुसंधान संस्थान (आईसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआईवी) या दोन्ही संस्थांनी मिळून यासाठी काम केले आहे. विषाणूचा स्ट्रेन एनआईवी येथे आयसोलेड करण्यात आला होता. त्यानंतर बायोटेक पाठवण्यात आले होते. जिथे डीसीजीआयतर्फे या लसीला मंजूरी देण्यात आली आहे.
विविध वयोगटातील लोकांवर याचे परीक्षण केले जाणार आहे. याद्वारे मानवाच्या विविध आयुर्मानाच्या टप्प्यात ही लस काय परीणाम करते याचा शोध घेतला जाणार आहे. प्रत्येक वयोगटासाठी ही लस योग्य असल्यास याचा वापर कोरोनावरील लस म्हणून केला जाईल. तसेच या लसीमुळे होणारे साईड इफेक्टसही तपासले जातील. या लसीचा तिसरा टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू केला जाईल. यात हजारो लोकांवर याची चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.