'विरप्पन' अजूनही जिवंतच ! माणसातला दानवी चेहरा उघड

    03-Jun-2020
Total Views | 162
Kerala _1  H x





आपल्याला जणू देवाने पृथ्वी काबीज करण्यासाठीच पाठवले आहे, आपण इथले सर्वश्रेष्ठ प्राणी आहोत, असा भ्रम मनुष्याला ज्या दिवशी झाला तेव्हाच खरंतरं त्याच्या विनाशाची सुरुवात झाली... पोलीस अधिकाऱ्यांना हस्तीदंतांसाठी आणि चंदन तस्करीसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या 'विरप्पन'ला तर कंठस्नान घातले मात्र, त्यांची वृत्ती संपवू शकले नाहीत. केरळमध्ये गर्भार हत्तीणीच्या तोंडी फटाक्यांनी भरलेले अननस देण्याच्या घटनेनंतर मनुष्याचा दानवरुपी चेहरा पुन्हा उघड झाला. 



अंदाजे १४-१५ वर्षांची गर्भार हत्तीण... पलक्कडमधल्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कच्या परिसरातून रस्ता भरकटली. पोटातल्या गोळ्याला लागलेली भूक शमवण्यासाठी तिने वणवण सुरू केली होती. गावातून बाहेर पडली मात्र, कुणालाही इजा न करता किंवा त्रास न देता. कुणीतरी तिला डिवचण्याच्या आणि असूरी आनंद घेण्याच्या नादात तिला फटाके भरलेले अननस खाऊ घातले. भूकेने व्याकुळ झालेल्या त्या जीवाने समोरच्या व्यक्तीला मनोमन आशीर्वाद देत अननस दाढेखाली दाबला आणि फटाक्यांचा स्फोट झाला. संपूर्ण जबडा भाजला.




वेदना असह्य झाल्याने ती जवळच्या वेलियार नदीत उभी होती. सतत तीन दिवस त्याच तशीच अहोरात्र उभी राहीली. दातही तुटले. वेदना असह्य होत होत्या. वनाधिकारी तिच्यापर्यंत नदीत पोहोचू शकले नाहीत. तिला बाहेर काढण्यासाठी दोन प्रशिक्षित हत्ती पाचारण करण्यात आले पण ती जागचीच हलली नाही. शस्त्रक्रीया करण्यापूर्वी तिने प्राण सोडले. वनाधिकारी आणि डॉक्टरांना जखमा झाल्याची जागा सापडू शकली नाही. 


शवविच्छेदनात ती गर्भार असल्याचे समजले. ही बाब समजल्यावर डॉक्टरांनाही त्यांचे अश्रू अनावर झाले होते. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अंत्यसंस्कारावेळी डॉक्टर आणि वनाधिकारी मोहन कृष्णन यांनी तिला वाकून नमस्कार करत श्रद्धांजली वाहिली. कृष्णन यांनी फेसबूकवर भावूक पोस्ट लिहीली. देशभरातून याबद्दल संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इथल्या भागांमध्ये असा मानव-प्राणी संघर्ष सुरूच आहेत. हिंदू संस्कृतीत जिथे प्राण्यांना देव मानण्याची परंपरा आहे, निसर्ग ही सर्वातमोठी शक्ती मानण्याची पद्धती आहे. तिथल्याच देवभूमी केरळमध्ये असल्या घटनांनी मानवतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 



अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121