द्वेषावर चालवलेली द्वेषविरोधी आंदोलने

    25-Jun-2020   
Total Views | 105


Mahatma gandhi_1 &nb

वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद अशाप्रकारच्या भेदांविरुद्ध चाललेल्या आंदोलनाचे उद्धिष्ट समानता प्रस्थापित करण्याचे असले पाहिजे. इतिहासात या चळवळींचा उदय समता प्रस्थापित करण्यासाठीच झाला होता. मग ते अमेरिकेतील मताधिकारासाठी झालेले स्त्रियांचे आंदोलन असो अथवा आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचे आंदोलन.



अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनात महात्मा गांधींच्या पुतळ्याची सलग दोनदा विटंबना झाली आहे. विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्यालादेखील वर्णद्वेषाविरुद्ध चालवलेल्या या कथित आंदोलकांनी लक्ष्य केले. कोलंबस, राणी व्हिक्टोरियाचा पुतळादेखील आंदोलकांच्या विटंबना कार्यक्रमातून सुटला नाही. आंदोलकांच्या दृष्टीने ज्यांचे पुतळे उभारले गेले, तो प्रत्येकजण वर्णद्वेष्टा आहे. महापुरुषांनी इतिहासात घेतलेल्या भूमिकांना आजच्या परिप्रेक्ष्यात आपल्या चळवळीविरोधात दाखवून हे उद्योग करवून घेतले जातात. महात्मा गांधींच्या पुतळ्यासंदर्भाने अमेरिकेने भारताची माफी मागितली. ‘Black Lives Matters' या आंदोलनातील पुतळा विटंबना कार्यक्रमात गांधींच्या पुतळ्याला करण्यात आलेली हानी लक्षवेधी ठरली होती. त्याचे एक कारण म्हणजे गांधींच्या आयुष्यातील दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन. तसेच मार्टिन ल्युथर ते नेल्सन मंडेला या वर्णद्वेषाविरोधात लढणार्‍या मोठ्या असामींनी गांधीजींचा आदर्श म्हणून केलेला उल्लेख. तरीही सध्या सुरू असलेले हे वर्णभेदाविरोधातील आंदोलन यापैकी काहीच मान्य करायला तयार नाही. त्याउलट प्रत्येकाला ‘वर्णद्वेष्टा’ सिद्ध करण्यात या आंदोलनाला अधिक रस आहे. एकंदर या आंदोलनाची दिशा आणि आजवर आंदोलनाच्या नावाखाली झालेले उद्योग लक्षात घेतले, तर यातून साध्य काय करायचे आहे, ते आपल्या लक्षात येईल.
 

वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद अशाप्रकारच्या भेदांविरुद्ध चाललेल्या आंदोलनाचे उद्धिष्ट समानता प्रस्थापित करण्याचे असले पाहिजे. इतिहासात या चळवळींचा उदय समता प्रस्थापित करण्यासाठीच झाला होता. मग ते अमेरिकेतील मताधिकारासाठी झालेले स्त्रियांचे आंदोलन असो अथवा आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचे आंदोलन. या चळवळींना ठराविक उद्देश होते. त्याउलट आज सुरू असलेली आंदोलने या भेदभावाच्या मानसिकतेविरोधात चालवलेली आंदोलने आहेत, असा आंदोलकांचा दावा असतो. त्यातून मानसिकता बदलण्यासाठी कोणतेही रचनात्मक कार्यक्रम हे आंदोलक देऊ शकत नाहीत. अशा कथित समतावादी चळवळींचे नेतृत्व करणार्‍यांना रचनात्मक कार्यक्रमातून परिवर्तन, सलोखा याविषयी उत्तरे शोधण्यात रस नसतो. त्याउलट सगळं जग कस आपल्या विरोधात आहे, हेच आपल्या अनुयायांना दाखवून द्यायचे असते. चळवळीतील कार्यकर्ते विध्वंसक कृती-कार्यक्रमांना अधिक पसंती देऊ लागतात. हे सर्व होत असताना समतेसाठी चालवलेल्या लढ्याच्या इतिहासातील सौंदर्यस्थळे अडसर ठरू लागतात. कारण, काहीतरी सकारात्मक घडू शकते, कधीकाळी घडले आहे, हे द्वेषावर चालणार्‍या कथित द्वेषविरोधी चळवळींना जाणून घेण्याची इच्छा नसते. कारण, सकारात्मक काहीतरी घडवायचे म्हणजे जबाबदारीचा प्रश्न येतो. त्याऐवजी नकारात्मकता दाखवून विद्ध्वंस सुरू ठेवणे सोपे जाते. १३ डिसेंबर २०१८ रोजी घाणा विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेला गांधींचा पुतळा याच मानसिकतेने हटविण्यात आला होता. गांधीजींच्या आयुष्यातील काही वक्तव्यांचा विपर्यास करून गांधीदेखील वर्णवादी होते, असे दाखविण्याचा प्रयत्न या चळवळीने यशस्वीपणे केला आहे. नताल संसदेला लिहिलेल्या पत्रात गांधींनी केलेल्या विधानाचा संदर्भ दिला जातो. मुख्य म्हणजे, गुलाम वाहेद व अश्विन देसाई या दोघांनी लिहिलेले ‘साऊथ आफ्रिकन गांधी’ हे पुस्तक याला कारणीभूत ठरले. अमेरिकेतील आंदोलनात गांधींच्या पुतळ्यांची विटंबना होण्यास हीच वैचारिक मांडणी कारणीभूत ठरलेली दिसते.
  
भारतातही असे प्रकार कथित समतावादी चळवळींमार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही विशिष्ट प्रतीके उभी करून त्याआडून द्वेषाने पछाडलेल्या टोळ्या तयार करणे हाच यांचा उद्देश. जसे टिळकांची वेदोक्त प्रकरणातील भूमिका दाखवताना बर्वे प्रकरणाचा संदर्भ द्यायचा नाही. गोळवलकर गुरुजींच्या ‘चातुर्वर्ण्य’ या मुलाखतीची तोडमोड करून वैचारिक मांडणी करायची. १९३९ सालच्या लेखनातील एका वाक्याचा संदर्भ घेऊन गोळवलकर गुरुजींना ‘हिटलर समर्थक’ ठरवायचे. इतिहासात लिहिल्या गेलेल्या एखाद्या वाक्याचा, विधानाचा संदर्भ देऊन असे युक्तिवाद उभारले जातात. सगळेच आपल्या विरोधात होते, आहेत व भविष्यातही असणार आहेत, हेच कायमस्वरूपी मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरंतर समतेसाठी चाललेल्या आंदोलनांसमोर द्वेषाचे निर्मूलन करणे हा उद्देश असला पाहिजे. पण, त्याउलट या आंदोलनांना द्वेषाचेच इंधन झाले आहे की काय, असा प्रश्न पडतो.

 

सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121