शहीद सुनील काळे अनंतात विलीन!

    24-Jun-2020
Total Views | 89

sunil kale_1  H



पाणावलेल्या डोळ्यांनी, जड अंत:करणाने गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!


सोलापूर : पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढतान शहीद झालेले सोलापुरातील सुनील काळे अनंतात विलीन झाले आहेत. लष्करी इतमामात त्यांच्यावर पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.


सीआरपीएफ, तसेच ग्रामीण पोलिसांनी शहीद सुनील काळे यांना मानवंदना दिली. सुनील काळे यांना निरोप देण्यासाठी आरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील सुनील दत्तात्रय काळे शहीद झाले. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत.सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121